घरताज्या घडामोडीप्राजक्ता गायकवाडचे 'साजनी' हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

प्राजक्ता गायकवाडचे ‘साजनी’ हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

नवीन गाण्याला प्रेक्षकांची  पसंती

‘स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज’ या मालिकेत महाराणी येसूबाई राणीसाहेबांची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांच्या मनात तिच्या अभिनयाच्या जोरावर घर केले आहे. या आधी ऐतिहासिक भूमिकेत पहायला मिळणारी प्राजक्ता आता नॉर्मल लूकमध्ये दिसणार आहे. प्राजक्ता ‘साजनी’ या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणजेच ६ ऑक्टोबरला या गाण्याचा टिझर लाँच झाला असून, आता हे गाणं प्रेक्षकांना युट्युब, मायबोली चॅनेलवर पाहायला मिळणार आहे. या गाण्याची निर्मिती निर्माते शिवाजी जवळे, संदीप कुंजीर, गजानन सानप, संदेश भोंडवे यांनी केली आहे. तर S4G प्रॉडक्शन प्रस्तुत हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आणि अजूनही प्रेक्षक या भूमिकेसाठी तिला दाद देत आहेत.आता प्राजक्ता प्रेक्षकांसमोर एका नव्या भूमिकेत येणार आहे.

- Advertisement -

 

प्राजक्ता सोबत या गाण्यात सिद्धांत तुपे दिसणार असून, त्याचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. “साजनी” हे त्यांच्या स्वप्नातील गाणं आहे. हे गाणं म्हणजे प्रत्येकाच्या मनामनातलं, स्वप्नातलं गाणं असल्याने प्रेक्षकांना हे गाणं नक्कीच भावेल यांत शंकाच नाही. हे गाणे धैर्य आणि तेजस यांनी स्वरबद्ध केले असून याची संकल्पना निर्माते शिवाजी जवळे यांची आहे. या गाण्याला धीरज भालेराव यांनी दिग्दर्शित केले असून, याचे डिझायनिंग शलाका बोजवार यांनी केले आहे. तर सीमा दारवटकर यांनी मेकअप आर्टिस्टची भूमिका उत्तमरीत्या पेलवली. बाळा कांबळे यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे.

- Advertisement -

 


हे ही वाचा – Happy Birthday Padmini Kolhapure : वयाच्या ७ व्या वर्षी अभिनयाला सुरुवात अन् १७ व्या वर्षी मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -