घरताज्या घडामोडीसमुद्रात मिळाले २ हजार वर्ष जुने आलिशान शहर! जगासमोर आला अद्भुत खजिना

समुद्रात मिळाले २ हजार वर्ष जुने आलिशान शहर! जगासमोर आला अद्भुत खजिना

Subscribe

इटलीतील समुद्राच्या आत एक खरे अटलांटिस शहर आढळल्याचे समोर आले आहे. २ हजार वर्ष जुने समुद्रात बुडालेले शहर बाइआचे अद्भूत फोटो आता जगासमोर आले आहेत. या फोटोंमध्ये बाइआ शहरातील आलिशान आयुष्य दिसत आहे. त्यामुळे आता हे शहर पर्यटकांचे आकर्षण केंद्र बिंदू झाले आहे. इटलीतील नेपल्स शहरा जवळ बाइआ हे शहर आहे. प्राचीन रोमन काळात या शहराला आधुनिक मॉन्टे कार्लोसारखी होती.

समुद्राच्या आत दिसलेल्या बाइआच्या खजिना पाहून तज्ज्ञांनी असा अंदाज लावत आहे की, हे श्रीमंत लोकांचे गाव होते. त्यामुळे या गावात श्रीमंत आणि शक्तिशाली लोकं काही दिवसांसाठी पार्टी करण्याकरिता यायचे. यादरम्यान संपत्तीचे प्रदर्शन केले जात असायचे. तसेच सीनेटर गेइस कालपुरनियूएस पिसोने कुख्यात राज नीरोच्या हत्येचा कट याच शहरात रचला होता. शिवाय बाइआ शहरमध्ये रोमन राजा ऑगस्टस, नीरो आणि कालीगुलाचे घर होते.

- Advertisement -

एवढेच नाहीतर येथे जुलियस सीजरचा विलाचे काही अवशेष मिळाले असून स्थानिक म्युझियममध्ये ते ठेवण्यात आले आहेत. डेली स्टारच्या वृत्तानुसार, ज्वालामुखी विस्फोटामुळे हे अलिशान शहराचे काही भाग समुद्रात बुडाले होते. पण आता हे समुद्रातील शहर पर्यटकाचे आकर्षक केंद्र बिदू बनले आहे. पर्यटक या शहराचे अवशेष गाईडच्या मदतीने पाहत आहेत.

- Advertisement -

इथेच सीनेटर पिसोचे घर होते. त्यामुळे पर्यटक हे शानदार शहर पाहू शकतात, जिथे पार्टी होत होत्या. एवढेच नाहीतर इथे स्पा देखील होते. तसेच या शहरात काही संगमरवरीच्या मूर्त्या सुद्धा होत्या. या मूर्त्यापाहून इटलीचा हुकूमशाहा मुसोलिनीने येथून पाणी बाहेर काढण्याचा पर्याय दिला होता, कारण इतर खजिनासुद्धा काढला जाऊ शकेल. सर्वात पहिल्यांदा १९४०च्या दशकात इटलीच्या एअर फोर्स पायलट रॅमोंडोने हे ठिकाण पहिल्यांदा ओळखले होते आणि एक विचित्र झपाटलेले शहर म्हणून त्याचे वर्णन केले होते.


हेही वाचा – केवळ २ टक्के भारतीयांचे कोरोनावर मास्क प्रभावशाली असल्याचे मत, अहवालातील धक्कादायक खुलासा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -