घरमुंबईनवी मुंबईत भाजपने गड केला काबिज

नवी मुंबईत भाजपने गड केला काबिज

Subscribe

यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाने नवी मुंबईचा गड काबिज केला आहे. बेलापूर, पनवेल आणि ऐरोलीत भाजपाचे उमेदवार यांनी बाजी मारली आहे.

यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाने नवी मुंबईचा गड काबिज केला आहे. बेलापूर, पनवेल आणि ऐरोलीत भाजपाचे उमेदवार यांनी बाजी मारली असून या तीन विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. बेलापूरमधून मंदा म्हात्रे विजयी झाले असून पनवेलमधून प्रशांत ठाकूर यांनी देखील विजय मिळवला आहे. तर एरोलीतून गणेश नाईकांनी देखील आपल्या गळ्यात विजयाची माळा घातली आहे.

मंदा म्हात्रे पुन्हा एकदा विजयी

माथाडी वर्गाला दोनदा मतदान करण्याचे आवाहन करून खळबळ उडवून देणाऱ्या भाजपच्या बेलापूरमधील आमदार मंदा म्हात्रे यांचा पुन्हा एकदा ४५ हजार १२५ मतांनी विजय झाला आहे. २०१४ साली त्या ५५ हजार ३१६ हजार मतांनी विजयी होत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे गणेश नाईक यांचा पराभव केला होता आणि पुन्हा एकदा त्यांनी विजयाची माळ गळ्यात घातली आहे. बेलापूर मतदारसंघाकरिता १ लाख ७४ हजार २८३ मतदानाची नोंद झाली होती. मंदा म्हात्रेंच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीतर्फे अशोक गावडे आणि मनसेतर्फे गजानन काळे या दोन उमेदवार होते. यांचा पराभव करत मंदा म्हात्रे या विजयी झाल्या आहेत.

- Advertisement -

गणेश नाईक विजयी

नवी मुंबईतील राष्ट्रवादीचा मोठा चेहरा असलेल्या गणेश नाईकांचा विजय झाला आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघाकरीता १ लाख ९६ हजार १२८ मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. ऐरोलीत भाजपातर्फे उमेदवार गणेश नाईक यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार गणेश शिंदे असा सामना रंगला होता. मात्र, गणेश नाईकांनी बाजी मारली आहे.

भाजपाचे प्रशांत ठाकूर विजयी

पनवेलमधून भाजपाचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांचा विजय झाला आहे. आतापर्यंत शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असलेला पनवेल विधानसभा मतदारसंघ भाजपाने काबिज केला आहे. पक्षाची चुकलेली ध्येयधोरणे, पारंपारिक पद्धतीने बदल करण्यात दाखवलेली उदासिनता, बाहेरुन आलेल्या लोकांची मने जिंकण्यात आलेले अपयश, पक्षात स्थानिक प्रकल्पग्रस्तांचाच बोलबाला या कारणांमुळे शेकापला पनवेल शहरात उतरती कळा लागली आहे. तसेच एकेकाळी शेकापमध्ये असलेल्या प्रशांत ठाकूर यांनी बाहेर पडत कॉंग्रेसमधून २००९ साली तर भाजपामध्ये २०१४ साली आमदारकी पटकावली होती. या दरम्यान त्यांनी केलेल्या कामांमुळे प्रशांत ठाकूर यांचे पारडे जड होत यंदाच्या निवडणूकीमध्ये देखील त्यांनी विजय मिळवला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अणुशक्तीनगरमधून नवाब मलिक विजयी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -