घरमहाराष्ट्रकाँग्रेसने केल्या निवडणूक आयोगाकडे २२१ तक्रारी, सर्वाधिक औरंगाबादमध्ये!

काँग्रेसने केल्या निवडणूक आयोगाकडे २२१ तक्रारी, सर्वाधिक औरंगाबादमध्ये!

Subscribe

विधानसभा निवडणुकांच्या आधी इव्हीएमविरोधात रान उठवणाऱ्या काँग्रेसने आज मतजदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाकडे तब्बल २२१ तक्रारी केल्या आहेत. यात इव्हीएम मशीन बंद पडण्याच्या जशा तक्रारी आहेत, तशाच सेना-भाजपच्या उमेदवारांनी आचारसंहितेचा भंग केल्याच्या देखील तक्रारी आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघात सकाळपासून ६ मतदान यंत्र बंद पडल्याचा देखील प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या या तक्रारींवर आयोगाकडून काय पाऊल उचलले जाते, याची चर्चा सध्या सुरू आहे.

कुठे किती तक्रारी?

अचलपूर – १
ऐरोली – १
अकोला पूर्व – १
अकोला पश्चिम – १
अकोट – ३
आंबेगाव – १
अमरावती – ४
अंधेरी पश्चिम – १
अणुशक्तीनगर – १
औरंगाबाद – १३
औसा – १
बाळापूर – ३
भोकर – ५
बोरीवली – १
बुलढाणा – २
भायखळा – १
चांदिवली – ३
चंद्रपूर – ४
चिखली – १
चिमूर – १
चोपडा – १
कुलाबा – १
धुळे शहर – १
दिंडोशी – ३
गडचिरोली – १
घाटकोपर – २
गोरेगाव – २
कोल्हापूर उत्तर – ६
कोल्हापूर दक्षिण – २
कर्जत-जामखेड – ३
जालना – ४
हिंगणघाट – २
जामनेर – १
जोगेश्वरी पूर्व – २
कराड उत्तर – १
कसबा पेठ – २
करवीर – १
खामगाव – २
किणवट – १
कोपरी पाचपाखाडी – १
कुर्ला – १

- Advertisement -

वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळच्या सुमारास बीडीडी चाळीमध्ये असलेल्या ६२ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर ६ वेळा मशीन बिघडल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाचे उमेदवार सुरेश माने यांच्याकडून त्या मतदान केंद्रात फेरमतदान करण्याची मागणी करण्यात आली आहे.


हेही वाचा – वरळीत ६ वेळा बंद पडलं वोटिंग मशीन, EVMमध्ये काळंबेरं?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -