घरमहाराष्ट्रलातूरमध्ये देशमुख बंधू विजयाच्या वाटेवर!

लातूरमध्ये देशमुख बंधू विजयाच्या वाटेवर!

Subscribe

लातूर शहर मधून अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण मधून धीरज देशमुख यांनी मतमोजणीत आघाडी घेतली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लातूरच्या दोन्ही मतदारसंघात राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव विजयाच्या वाट्यावर आहेत. त्यामुळे लातूरकरांनी देशमुखांची साथ कायम ठेवल्याचेच या निकालावरून दिसते. लातूर शहर मधून अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण मधून धीरज देशमुख यांनी मतमोजणीत आघाडी घेतली आहे. अमित देशमुख यांना राजकारणाचा बराचसा अनुभव असताना धीरज देशमुख मात्र पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

हेही वाचा – दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ; विश्वनाथ महाडेश्वर पिछाडीवर

लातूर शहर मध्ये अमित देशमुख हे काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत असून त्यांना आतापर्यंत ६६ हजार ६४५ मतं पडली आहेत. तर धीरज देशमुख हेसुद्धा काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत असून त्यांनी १ लाख ३१ हजार ३२१ मतांनी आघाडी घेतली आहे. धीरज देशमुख यांच्या पाठोपाठ सर्वाधिक मतं नोटा या ऑप्शनला पडल्याने लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची सर्वत्र चर्चा आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहे. त्यांच्या समोर शिवसेनेचे सचिन देशमुख यांचं आव्हान आहे. तर, अर्जुन वाघमारे हे अपक्ष म्हणून लढले. मात्र, सुरुवातीपासूनच या मतदारसंघात धीरज यांची हवा होती. त्यांचे धाकटे बंधू अभिनेते रितेश देशमुख यांनी त्यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता. त्याचं प्रतिबिंब निकालात पडलेलं दिसत आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार धीरज देशमुख हे आघाडीवर आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – साताऱ्यात उदयनराजे भोसलेंचा पराभव; शरद पवारांची झुंज यशस्वी!

लातूर शहर विधानसभा मतदारसंघातही अमित देशमुख आघाडीवर आहेत. अमित देशमुख हे ६६ हजार ६४५ मतांनी ते आघाडीवर आहेत. त्यांच्या पाठोपाठ भाजपचे शैलेश लाहोटी यांना आतापर्यंत ४४ हजार २०८ मतं पडली आहेत. २०१४ मध्ये अमित देशमुख यांनी भाजपच्या शैलेश लाहोटी यांचा जवळपास ५० हजार मतांनी पराभव केला होता. यंदाही तेच या मतदारसंघात आघाडीवर आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -