घरमहाराष्ट्रपंकजा मुंडेंचे भाऊ अनेक, पण परळीकरांची धनुभाऊलाच साथ

पंकजा मुंडेंचे भाऊ अनेक, पण परळीकरांची धनुभाऊलाच साथ

Subscribe

धनंजय मुंडे यांचा दणदणीत विजय

विधानसभा निवडणुकीत परळीमध्ये काॅंटे की टक्कर पाहायला मिळत होती. निकालानंतर पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव झाला असून धनंजय मुंडे यांचा दणदणीत विजय झाला आहे. गेले तीन आठवडे परळीकरांनी दोन्ही मुंडे बंधु-भगिणींची भाषणे ऐकली होती. मात्र १९ तारखेला धनंजय मुंडे यांची एक क्लिप व्हायरल करुन त्यांच्यावर पंकजा मुंडे यांचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला. १९ ऑक्टोबरला प्रचार बंद झाल्यानंतर परळीमध्ये मात्र वेगळ्या पद्धतीने प्रचार सुरु होता. पंकजा मुंडे यांनी धनंजय माझे भाऊ नसून मला राज्याने अनेक भाऊ दिले असल्याचे सांगितले होते. तर याच नवीन भावांनी आमच्या नात्यात विष कालवले अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली होती. मात्र २१ तारखेला परळीकरांनी धनुभाऊंनाच साथ देत, पंकजा मुंडे यांना धक्का दिला आहे.

परळीमध्ये धनंजय मुंडे हे धनुभाऊ या नावाने प्रसिद्ध आहेत. परळीचे राजकारण गेले कित्येक वर्ष गोपीनाथ मुंडे यांच्या नावाभोवती फिरत आहे. २००९ साली धनंजय मुंडे यांनी स्वतःहून हा मतदारसंघ पंकजा मुंडे यांना दिला होता, असे ते नेहमी सांगतात. यावेळी पंकजा यांनी स्वतःहून परळीतला विजय सोपा नाही, असे सांगितले होते. आता या वक्तव्यानंतर परळीकरांनी धनंजय मुंडेंना साथ दिली की पंकजा मुंडे यांचे वक्तव्य खरे ठरवले, हा देखील प्रश्न उपस्थित होतो.

- Advertisement -

पराभवानंतर माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, बीडच्या राजकारणाचा कल मला आज लक्षात आला.
मी शेवटच्या सभेत मतदारांना सांगितलं होतं की, “एक तर तुम्ही मुक्त व्हा किंवा मला या गलिच्छ राजकारणातून मुक्त करा” मात्र भविष्यात काय वाढून ठेवलं? मला माहीत नाही. माझ्या ५ वर्षांच्या सत्तेचा काळ मला कुठेही सत्तेचा काळ वाटला नाही. मात्र मी संघर्ष केला, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -