घरमुंबईमातोश्रीच्या अंगणात शिवसेना पराभूत; काँग्रेसचे झिशान सिद्धिकी विजयी!

मातोश्रीच्या अंगणात शिवसेना पराभूत; काँग्रेसचे झिशान सिद्धिकी विजयी!

Subscribe

विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबई महापालिकेचे विद्यमान महापौर आहेत म्हणजे ते मुंबईचे प्रथम नागरिक आहेत. मुंबईच्या प्रथम नागरिकांचा झालेला हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागणार आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणारा वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे उमेदवार झिशान सिद्धिकी यांचा या मतदारसंघात विजय झाला आहे. विशेष म्हणजे हा मतदारसंघ मातोश्रीच्या अंगणातला मतदारसंघ मानला जातो. विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबई महापालिकेचे विद्यमान महापौर आहेत म्हणजे ते मुंबईचे प्रथम नागरिक आहेत. मुंबईच्या प्रथम नागरिकांचा झालेला हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी नारायण राणे यांचा प्रचंड मतांनी पराभव केला होता. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेने तृप्ती सावंत यांचेच तिकीट कापून मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारीचे तिकीट दिले होते. त्यामुळे तृप्ती सावंत नाराज झाल्या होत्या. त्यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल करुन निवडणुकीच्या रिंगणात उडी मारली होती. शिवसेना पक्षातच झालेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला या नामुष्कीला सामोरे जावे लागले असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

बंडखोरीचा फटका शिवसेनेला?

वांद्रे पूर्व मतदारसंघात तृप्ती सावंत यांचे पती प्रकाश सावंत यांचे चांगले वर्चस्व होते. मतदारसंघातील मुस्लीम समुदायाशी देखील त्यांचे जवळचे संबंध होते. त्यामुळे या मतदारसंघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. मात्र, प्रकाश सावंत यांचे निधन झाले. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. पोटनिवडणुकीत प्रकाश सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना सेनेने उमेदवारी दिली. तर त्यांच्या समोर नारायण राणे यांचे कडवे आव्हान उभे होते. मात्र, लोकांनी तृप्ती सावंत यांच्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे राणेंचा १८ हजार मतांनी पराभव झाला. त्यानंतर सध्याच्या निवडणुकीत शिवसेनेने तृप्ती यांचे तिकीट कापून महाडेश्वर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे तृप्ती यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला. तृप्ती सावंत यांनी निवडणुकीच्या रणांगणात पक्षाविरोधात जावून प्रवेश केल्यामुळे शिवसेनेने त्यांना पक्षातून काढले. त्यामुळे जनतेच्या मनात शिवसेनेच्या प्रती वेगळे चित्र निर्माण झाले. शिवसेनेच्या प्रतिष्ठीत अशा दिवंगत आमदारांच्या पत्नीसोबत पक्षाने अशी वागणूक दिल्यामुळे वांद्रे पूर्व मतदारसंघाच्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि पक्षांतर्गत चाललेल्या या वादाचा फायदा काँग्रेसला झाला. त्यामुळे काँग्रसचे उमेदवार झिशान सिद्धिकी यांचा विजय झाल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -