घरमहाराष्ट्र'मुख्यमंत्री मस्तवाल झालेत; त्यांना फक्त भाजप आणि निवडणुका दिसतात'

‘मुख्यमंत्री मस्तवाल झालेत; त्यांना फक्त भाजप आणि निवडणुका दिसतात’

Subscribe

बुधवारी पुण्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे पुण्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी युतीवर चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले होते. त्यांच्यासोबत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील दिल्ली गेले. मुख्यमंत्र्यांनी पुण्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थिती संदर्भात ट्विटरवर हळहळ व्यक्त केली असली तरी विरोधकांनी मुख्यंमंत्र्यांवर निशाना साधला आहे.

‘मुख्यमंत्री एवढे मस्तवाल झाले आहेत की त्यांना भाजप आणि निवडणुका याव्यतिरिक्त काहीच दिसत नाही’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. बुधवारी पुणे आणि नाशिकमध्ये झालेल्या पावसाने हाहा:कार उडाला असून त्यामध्ये आतापर्यंत ११ जणांचा बळी गेला आहे. या घटनेवर बोलताना नवाब मलिक यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.


हेही वाचा – पुण्यात पूर; पण मुख्यमंत्री आणि पालकमंत्री खूपच दूर!

- Advertisement -

नेमके काय म्हणाले नवाब मलिक?

‘महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन झोपलेले आहे. त्यामुळे पुणे नाशिक येथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत झालेली पुरपरिस्थिती असेल किंवा महालक्ष्मी एक्स्प्रेसचा प्रसंग असेल त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन झोपलेले होते. ही परिस्थिती हाताळण्याचे काम मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांची आहे. परंतु, हे लोक दिल्लीत जावून बसतात’, असे नवाब मलिक म्हणाले. त्याचबरोबर ‘जनतेवर कितीही संकटे आली तरी याची चिंता यांना नाही. त्यांना चिंता फक्त निवडणुकीत सत्तेत कसे यायची याची आहे’, असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.

- Advertisement -

हेही वाचा – Live Update – पुण्यात पावसाचा कहर; १२ जणांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -