घरमुंबईठाण्यात राष्ट्रवादीचा मनसेला उघड पाठिंबा? राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज मागे

ठाण्यात राष्ट्रवादीचा मनसेला उघड पाठिंबा? राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज मागे

Subscribe

विधानसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान, मतांचे विभाजन होऊ नये म्हणून सर्वच पक्ष प्रतिस्पर्धीचे मनधरणी करण्याचे प्रयत्न करत आहे. शिवसेना आणि भाजप पक्षाची युती झाली असली तरी राज्यातील जवळपास ७५ टक्के मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांकडून बंडखोरी झाल्याचे चित्र दिसत आहे. या बंडखोरांचे मनधरणी करण्याचे काम दोन्ही पक्षाकडून सुरु आहेत. दरम्यान, ठाण्यात मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माघार घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार सुहास देसाई यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे आणि त्यांनी अविनाश जाधव यांना पाठिंबा दर्शवल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा – मोदी-पवारांमधला कलगीतुरा रंगणार; प्रचारसभेच्या तारखा जाहीर

- Advertisement -

ठाण्यात भाजप विरुद्ध मनसे लढत रंगणार

मतांचे विभाजन होऊ नये आणि मनसेचा फटका बसू नये, असा मानस राष्ट्रवादीचा असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. याच संदर्भात ठाण्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुहास देसाई यांची काल म्हणजे रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. त्याच्यानंतर आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. देसाई यांचा अर्ज मागे घेतल्यानंतर ठाण्यात भाजप आणि मनसे यांच्यात थेट लढत बघायला मिळणार आहे. ठाणे शहर मतदारसंघात भाजपकडून संजय केळकर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे केळकर विरुद्ध जाधव असा थेट सामना आता पहायला मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -