घरमहाराष्ट्र'या' राजकीय भूकंपाचा झटका मलाही बसला - सुजय विखे पाटील

‘या’ राजकीय भूकंपाचा झटका मलाही बसला – सुजय विखे पाटील

Subscribe

'राजकारणाचा मलाही झटका बसला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले सरकार स्थिर सरकार असेल', असा विश्वास खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रसार माध्यामांशी बोलताना व्यक्त केला आहे.

‘राज्यात आज, शनिवारी घडलेल्या राजकारणाचा मलाही झटका बसला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले सरकार स्थिर सरकार असेल’, असा विश्वास खासदार सुजय विखे पाटील यांनी लोणी येथे प्रसार माध्यामांशी बोलताना व्यक्त केला आहे. आज राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप झाला असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली याची माहिती मला आज सकाळीच समजली.

काय म्हणाले सुजय विखे पाटील

गेल्या दोन दिवसात मुंबईत वेगाने राजकीय घडामोडी सुरु होत्या. खासदार विखे हे शनिवारी सकाळी आपल्या शिर्डी मतदारसंघातच होते. सकाळी ९.३० वाजता प्रवरानगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन आणि ऊस गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमाच्या ठिकाणी विखे उपस्थित झाले होते. त्यावेळी ते प्रसार माध्यमांच्या बोले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – #Live : ‘मी इथेच आहे’, धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -