घरमहाराष्ट्रप्रणिती शिंदेंना मेकअप बॉक्स भोवणार? गुन्हा दाखल करण्याचे आदेश

प्रणिती शिंदेंना मेकअप बॉक्स भोवणार? गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Subscribe

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यंच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर देखील मतदारांना आकर्षित करण्यासाठी मेकअप बॉक्स वाटप केल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांच्यावर करण्यात आला होता. याच आरोपावरून प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. सोलापूरचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हे आदेश दिले आहेत. दरम्यान, प्रणिती शिंदेंवरच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी गुन्गे दाखल करण्याचे आदेश दिल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.


हेही वाचा – मतदारांना मेक अप बॉक्स वाटले? आमदार प्रणिती शिंदेंविरोधात तक्रार

२१ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. त्यामुळे घोषणा झाल्यापासूनच राज्यात आचारसंहिता लागू झाली. मात्र, त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघात विडी घरकूल परिसरामध्ये मेकअप बॉक्सचं वाटप केल्याची तक्रार एका महिलेने माजी आमदार नरसय्या आडम यांच्याकडे केली. त्यावरून आडम यांनी मेकअप बॉक्स वाटत असल्याच्या पुराव्यांनिशी जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली. त्याच आधारावर आता प्रणिती शिंदेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

- Advertisement -

गणेशोत्सवादरम्यान वाटले होते बॉक्स – प्रणिती शिंदे

दरम्यान, प्रणिती शिंदे यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. ते मेकअप बॉक्स गणेशोत्सवादरम्यान वाटण्यात आले होते, असं स्पष्टीकरण प्रणिती शिंदेंनी दिलं आहे. मात्र, तरीदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -