घरमुंबईशिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणे अशक्य - संजय राऊत

शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणे अशक्य – संजय राऊत

Subscribe

शिवसेनेशिवाय महाराष्ट्रात भाजपची सत्ता स्थापन होऊच शकत नाही, अशा आशयाची आक्रमक भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

विधानसभा निवडणुकांसाठी रविवारी म्हणजेच २१ ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर वृत्त वाहिन्यांवर सर्व्हे जाहीर झाले. हे सर्व्हे पाहता पुन्हा एकदा राज्यात युतीचंच सरकार येणार असंच चित्र आहे. पण काही सर्वेंमध्ये तर भाजप एकहाती बहुमताच्या आकड्याच्या जवळ जात असल्याचे दाखवण्यात येत आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेशिवाय सरकार स्थापन करणार की काय? अशी चर्चा देखील राजकारणात सुरू झाली. मात्र, शिवसेना खासदास संजय राऊत यांनी, ‘राज्यात भाजपला शिवसेनेशिवाय पर्याय नसल्याचे सांगत, शिवसेनेशिवाय भाजप राज्य करू शकत नाही’, असे माध्यमांशी बोलताना सांगितले. एवढेच नाही, तर ‘शिवसेना पुढेही सत्तेत राहील. कोणी कितीही प्रयत्न केला, तरी शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणे शक्य नाही’, असे देखील संजय राऊत यांनी सांगितले.

महायुती २०० पार करणार

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी ‘शिवसेना – भाजप महायुती मिळून २०० च्या वर जागा जिंकेल’, असे सांगत ‘शिवसेना १०० च्या वर जागा जिंकेल’, असे देखील सांगितले. एवढेच नाही तर, ‘२०१४ मध्ये युती नसताना देखील आम्ही निवडणूक लढली’, असे सांगत ‘भाजपला आता जास्त जागा मिळाल्या तरी राज्यात शिवसेनेचे महत्त्व कमी होणार नाही’, असेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘मला हरवण्यासाठी ठाकरेंना पैसा वापरावा लागला’

मग अंदाज कशाला लावत बसायचा?

विशेष म्हणजे एक्झिट पोलने दिलेल्या अंदाजाबदद्ल संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी ‘एक्झिट पोल हे त्यांच्या पद्धतीने काम करत असतात. पोल घेण्याची गरज आम्हाला वाटत नाही. गुरूवारी (उद्या) निकाल लागणारच आहेत. मग अंदाज कशाला लावत बसायचा?’ असे सांगितले. शिवाय, ‘आर आर पाटील यांनी मटका लावणे कधीच बंद केले असून राजकारण्यांना एखाद्या आकड्यावर टिकून राहणे शोभत नाही’, असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -