घरमुंबई'अब हारना और डरना मना है...'; संजय राऊत यांचे नवे ट्विट!

‘अब हारना और डरना मना है…’; संजय राऊत यांचे नवे ट्विट!

Subscribe

गेल्या पंधरा दिवसापासून संजय राऊत हे शिवसेनेची बाजू माध्यमांसमोर मांडत आहेत. दररोज सकाळी घेतली जाणारी पत्रकार परिषद असो वा एखाद समर्पक ट्विट करण्याचे त्यांनी सातत्य ठेवले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांना काल, बुधवारी लिलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर लगेचच ते पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात सक्रीय झाले आहेत. आज, गुरुवारी संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमधून आता थांबून चालणार नाही, अशा आशयाचे ट्विट करत शिवसैनिकांमध्ये नवी ऊर्जा भरण्याचे काम केले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून संजय राऊत हे शिवसेनेची बाजू माध्यमांसमोर मांडत आहेत. दररोज सकाळी घेतली जाणारी पत्रकार परिषद असो वा एखाद समर्पक ट्विट करण्याचे त्यांनी सातत्य ठेवले आहे. तसेच आजही ट्विट करून त्यांनी भावना मांडल्या आहेत.

- Advertisement -

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे की, हार हो जाती है जब मान लिया जाता है, जीत तब होती है जब ठान लिया जाता है. जोपर्यंत आपण स्वतः अपयश झालेलं स्विकारत नाही तोपर्यंत हरलेलो नसतो आणि एकदा आपण जिंकणार हे मनाशी पक्क झाल्या यश नक्कीच मिळतं, असा या विधानाचा अर्थ होत आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी लढाई संपली नसल्याचे संकेत दिले आहेत.

- Advertisement -

तसेच त्यांनी काही तासांपूर्वी आणखी एक ट्विट केले असून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेता अहमद पटेल यांची दोन दिवसांपूर्वी भेट झालीच नसल्याचे स्पष्ट केले आहे. मंगळवारी रात्री उद्धव ठाकरे आणि अहमद पटेल यांची भेट झाल्याची चर्चा प्रसार माध्यमांमध्ये सुरु होती. मात्र संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून या गोष्टीचे खंडन केले आहे.

हेही वाचा –

…हे त्यांचे नक्राश्रू; सामनामधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -