घरमहाराष्ट्रपेढ्यांची ऑर्डर गेली असं समजा - संजय राऊत

पेढ्यांची ऑर्डर गेली असं समजा – संजय राऊत

Subscribe

राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता संजय राऊत यांचे वक्तव्य अत्यंच सूचक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. कारण शिवसेनेसोबत युती करण्यास आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.

‘भाजप गोड बातनी देऊ शकली नाही. त्यामुळे ती गोड बातमी शिवसेना देणार आहे. यासाठी पेढ्यांची ऑर्डर गेली असल्याचे समजा’, असे शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत म्हणाले. राऊत त्यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी बागेत आपल्या मुलीसोबत फेरफटका मारत होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना सत्ता स्थापनेसंदर्भात काही प्रश्न विचारले. यावेळी राऊत यांनी लवकरच राज्यात सरकार स्थापन होईल, असा दावा केला आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता संजय राऊत यांचे हे वक्तव्य अत्यंच सूचक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. कारण शिवसेनेसोबत युती करण्यास आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.


हेही वाचा – दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक; संजय राऊत यांना बैठकीचा निरोप?

- Advertisement -

‘किमान समान कार्यक्रम राज्याचा हिताचा’

सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीर दिल्लीत प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. बुधवारी संध्याकाळी पाच वाजता शरद पवार यांच्या दिल्ली येथील ६ जनपत या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत किमान समान कार्यक्रमाबाबत चर्चा झाली असून या चर्चेत दोन्ही पक्षांचे एकमत झाले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, किमान समान वाटपाबाबत राऊत यांना प्रश्न विचारले असता ‘किमान समान कार्यक्रम राज्याचा हिताचा असतो. त्यामुळे त्यासाठी फार डोके फोडावे लागत नाही’, असे राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -