घरमुंबईउद्या शिवसेनेचा वचननामा जाहीर होणार

उद्या शिवसेनेचा वचननामा जाहीर होणार

Subscribe

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्याच आपला वचननामा प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे. उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वचननामाते प्रकाशन होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या प्रचारसभांमध्ये व्यग्र आहेत. काल त्यांनी संगमनेर दौरा केला. त्यानंतर सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना उद्या म्हणजे शनिवारी आपला वचननामा जाहीर करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या वचननाम्यांमध्ये नेमके कोणकोणते मुद्दे असतील? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी अनेक आश्वासन दिले आहेत. या आश्वनांपैकीच अनेक मुद्दे यात असण्याची शक्यता आहे.

वचननाम्यात ‘हे’ मुद्दे असण्याची शक्यता

१. शेतकऱ्यांचा सातबारा संदर्भात महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
२. राम मंदीर बांधण्याचे वचन
३. दहा रुपयांत जेवणाची थाळी मिळणार हा मुद्दा असण्याची शक्यता
४. युवावर्ग, बेरोजगारी यांच्या संदर्भात महत्त्वाचे मुद्दे असण्याची शक्यता
५. शिक्षणा आणि आरोग्य क्षेत्रात विशेष योजना
६. शहरांच्या विकासासाठी विशेष योजना
७. रोजगार उत्पन्नासाठी विशेष योजना

- Advertisement -

हेही वाचा – शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी बाबा रामदेव

दरम्यान, शिवसेनेच्या याअगोदरच्या वचननाम्यांचे काही मुद्दे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यामध्ये मुंबई संदर्भात ‘हे’ मुद्दे होते

- Advertisement -
  • करमुक्ती आणि कर सवलत

१. ५०० चौ. फुटापर्यंतच्या सर्व सदनिकांना मालमत्ता कर माफ. ५०० चौ. फुटांवरील व ७०० चौ. फुटांपर्यंत आकाराची घरे असलेल्या करदात्यांना मालमत्ता करात सवलत देणार.

२. ७०० चौ. फुटांवरील सदनिका धारकांसाठीही विशेष योजना

  • शिक्षण

१. देशाचे उज्वल भवितव्य असणाऱ्या तरुणांसाठी ‘ई’ वाचनालय उभारणार
२. कौशल्य विकासास व व्यावसायभिमुख शिक्षणास चालना
३. महापालिकेच्या शाळांमध्ये ‘आत्मपरिक्षण प्रशिक्षण केंद्र’
४. महापालिकेच्या शाळेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात महापालिका सेवेत नोकरीकरिता प्राधान्य
५. महापालिकेची ‘संगीत अकादमी’

  • सुंदर मुंबई, उद्याने, आरोग्य, कचरा व्यवस्थापन, पाणी, पर्यावरण, रस्ते, पूर नियंत्रण, बेस्ट बस सेवा, अशा विविध मुद्द्यांसंदर्भात यामध्ये माहिती देण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -