घरमहाराष्ट्रपुण्यातील काही लोकांनी मुंडे कुटुंबात भांडणे लावली

पुण्यातील काही लोकांनी मुंडे कुटुंबात भांडणे लावली

Subscribe

भाजपाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचे पुण्याशी आणि येथील अनेक कुटुंबांशी घरगुती स्वरूपाचे नाते होते. त्यांची ही नाती जपण्याचा मी प्रयत्न करीत आहे. मात्र, पुण्यातील काही लोकांनी मुंडे कुटुंबात भांडणे लावली.

स्वत:च्या जिल्ह्यात बारामती, आंबेगाव वगळता एकही जागा जिंकता आली नसताना बीडची धास्ती कशासाठी घेता, अशा शब्दांत शरद पवार व अजित पवार यांच्यावर नाव न घेता भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी टीका केली.

- Advertisement -

पुणे जिल्ह्यातील थेरगावमध्येही पंकजा मुंडे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. तेथे मुंडे यांचे भाषण सुरू असताना घर बचाव कृती समितीच्या सदस्यांनी अवैध बांधकामे, रिंग रोड आणि शास्तीकर या मुद्द्यांवर घोषणाबाजी करत भरसभेत गोंधळ घातला. या प्रश्नी जाब विचारण्यासाठी अचानक कृती समितीचे काही जण उभे राहिले. ’रिंग रोडचा प्रश्न सुटला पाहिजे, रिंग रोडमुळे अनेकांची घरे बाधित होत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येकाला घर मिळाले पाहिजे, असे म्हणतात; इथे मात्र आमच्या घरांवर हातोडा मारून आम्हाला बेघर केले जात आहे. अवैध बांधकामे, शास्तीकर १०० टक्के रद्द झाला पाहिजे,’ अशी मागणी हे सदस्य करू लागले. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी भाषण सुरू ठेवतच राष्ट्रवादी अशा प्रकारची लोकं पाठवून बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -