घरमुंबईविरोधकाने दर्शवली विनोद तावडेंबद्दल सहानभूती; म्हणाले 'हा नियतीचा अजब खेळ'!

विरोधकाने दर्शवली विनोद तावडेंबद्दल सहानभूती; म्हणाले ‘हा नियतीचा अजब खेळ’!

Subscribe

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि भोकर मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार अशोक चव्हाण यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या सल्ल्याबाबतचे मत मांडले आहे. भाजपने आपल्या सर्वच उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांना या यादीत स्थान देण्यात आले नाही. यालाच अनुसरून अशोक चव्हाण यांनी एका ट्विटर पोस्टच्या माध्यमातून तावडेंवर मिश्किल टीका केली आहे.

काय आहे ट्विट

भाजपने विनोद तावडे यांचे तिकीट कापल्यामुळे तावडेंवर विधानसभेत न जाण्याची वेळ आली आहे. तावडे यांच्या त्या विधानाचा योग्य वेळेची संधी साधून अशोक चव्हाण यांनी समाचार घेतला आहे. निवडणूक लढवू नये, असा अनाहूत सल्ला देणाऱ्या तावडेंना भाजपचे तिकिटही मिळू नये, हा नियतीचा अजब खेळ आहे. एक मित्र म्हणून मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, असे ट्विट अशोक चव्हाण यांनी केले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले होते विनोद तावडे 

अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवू नये, असे म्हणत विनोद तावडे यांनी अशोक चव्हाण यांना डिवचणारे वक्तव्य केले होते. लोकसभेला तुम्ही तोंडावर आपटलात, त्यामुळे विधानसभेत झाकली मुठ ठेवा, असा सल्लाही त्यांनी चव्हाण यांना दिला होता. काँग्रेसची स्थिती वाईट आहे. त्यांना जनाधार राहिलेला नाही, त्यामुळे लोकच त्यांना विधानसभेत नाकारतील, असे तावडेंनी त्यावेळी म्हटले होते.

- Advertisement -

हेही वाचा –

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा उडणार – संजय निरूपम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -