घरमहाराष्ट्रचिंचवड विधानसभेतून तृतीयपंथी निवडणूक लढणार

चिंचवड विधानसभेतून तृतीयपंथी निवडणूक लढणार

Subscribe

चिंचवड विधानसभेत जनहित लोकशाही या पक्षाच्या तृतीयपंथी नताशा लोखंडे या निवडणूक लढवणार आहेत.

विधानसभा निवडणुकीचे अवघ्या महाराष्ट्रात बिगुल वाजले असून सर्वच पक्षाकडून जय्यत तयारी सुरू आहे. अशातच पिंपरी-चिंचवड शहरात ‘जनहित लोकशाही’ या पक्षाकडून तृतीयपंथी नताशा लोखंडे यांना उमेदवारी दिली गेली आहे. सोमवारी जनहित लोकशाही पक्षाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. या परिषदेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली. नताशा चिंचवड विधानसभेतून लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्यासह पक्षाची इतर चार व्यक्ती देखील निवडणूक लढवणार आहेत, अशी माहिती नताशा यांनी पत्रकार परिषदेत दिली.


हेही वाचा – ..भाजपसोबत जाणं ही शिवसेनेची चूक होती – संजय राऊत

- Advertisement -

 

जनहित लोकशाही पक्षाकडून ‘हे’ उमेदवार लढणार

पिंपरी-चिंचवडमध्ये जनहित लोकशाही पक्षाकडून विधानसभेसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मावळ विधानसभेतून संतोष चौधरी, भोसरी विधानसभेतून विश्वास गजमल, चिंचवड विधानसभेतून तृतीयपंथी नताशा लोखंडे आणि पिंपरी विधानसभेतून अशोक आल्हाट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत तृतीयपंथी नताशा म्हणाल्या की, ‘माझा लढा हा सरकार विरोधी आहे. तृतीयपंथीयांचे अनेक प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे मला ही निवडणूक लढवायची आहे.’ दरम्यान, नताशा यांना चिंचवड मतदारसंघातील प्रश्नांची जाण नसल्याचे दिसले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांना घाम फुटला. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माघार घेणार नसल्याचे सांगत ‘मीच जिंकणार’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -