घरमहाराष्ट्र'सगळी वाट लाऊन झाली आणि आता रुग्णालयात दाखल'

‘सगळी वाट लाऊन झाली आणि आता रुग्णालयात दाखल’

Subscribe

'आता नवीन नाटक...सगळी वाट लाऊन झाली आणि आता अंगाशी येणार कळल्यावर रुग्णालयात दाखल झाल, असा टोला निलेश राणेंनी संजय राऊतांना लगावला आहे.

राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडी घडत असताना शिवसेना नेते संजय राऊत सातत्याने पक्षाच्यावतीने माध्यमांसमोर भूमिका मांडत आहेत. गेल्या ८ दिवसांपासून ते रोज सकाळी पत्रकार परिषदेतून संवाद साधत होते. मात्र, त्यांची आज अचानक तब्येत खालावल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावर पुन्हा एकदा माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊत यांना पुन्हा एकदा टोला लगावला आहे. निलेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली असून, ‘आता नवीन नाटक…सगळी वाट लाऊन झाली आणि आता अंगाशी येणार कळल्यावर रुग्णालयात दाखल. संज्या अजून किती खालची पातळी गाठणार तू. उद्धवची आणि शिवसेनेची वाट लावून आता दोन दिवस कोणालाच भेटणार नाही म्हणतो. शिवसैनिकांनो आताच तुम्हीच करा ह्याचा बंदोबस्त’, असे ट्विट केले आहे.

- Advertisement -

उध्दवला कॅटबरी चॉकलेट द्या

काहीवेळापूर्वी निलेश राणे यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत ट्विट केले होते की, ‘मला काल पासून वाटतंय येणाऱ्या काही दिवसांत शिवसैनिकच संज्या राऊतला धरून मजबूत चोपेल’. तसेच त्या आधीच्या ट्विटमध्ये निलेश राणे यांनी म्हटले आहे की, संज्या राऊत इतका गरीब आहे की मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघायला पवार साहेबांच्या घरी गेला. बाकी राहुदे त्याला अगोदर कोणी तरी TV आणि लाईट बिलचे पैसे द्या आणि उध्दवला कॅटबरी चॉकलेट द्या बिचाऱ्याला वाईट वाटलं की त्याला खोटारडा म्हटलं. शाळेत असल्यासारखा वाटलं त्याला बघून’.

- Advertisement -


हेही वाचा – अरेच्चा! सीसीटीव्ही रेकॉर्डर समजून सेटटॉप बॉक्सच पळवला


 

एक प्रतिक्रिया

  1. महाभारत आठवते. कर्णाचे रथाचे चाक जमिनीत रुतले तेव्हा अर्जुनाला त्याने युद्ध थांबव व निशःस्त्रावर बाण टाकू नये असा उपदेश केला. श्रीकृष्णांनी त्याच्या गैरकृत्याचे अनेक दाखले दिले व म्हणाले ,”तेव्हा गेला होता कोठे राधासुता तुझा धर्म?” आजची घडी अशीच वाटते.

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -