घरमहाराष्ट्रसत्ता स्थापनेत रस नाही; प्रफुल पटेलांनी 'ती' चूक यावेळी सुधारली

सत्ता स्थापनेत रस नाही; प्रफुल पटेलांनी ‘ती’ चूक यावेळी सुधारली

Subscribe

मागच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल येत असतानाच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर येऊन “आम्ही स्थिर सरकार देण्यासाठी भाजपला पाठिंबा देऊ”, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर एकच गोंधळ माजला होता. पुढचे अनेक वर्ष राष्ट्रवादीकडे संशयाच्या नजरेने पाहीले जात होते. मात्र यावेळी प्रफुल पटेल यांनी आपली जुनी चूक सुधारली आहे. राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेत रस नसून प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका आम्ही बजावू, असे वक्तव्य प्रफुल पटेल यांनी केले आहे.

२०१४ च्या निवडणुकीत सर्व पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली आहे. भाजपने १२२ जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर शिवसेना ६३ जागा मिळवून दुसऱ्या स्थानी होती. मात्र शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला नाही तर स्थिर सरकार मिळणार नाही. म्हणून पुर्ण निकाल हाती येण्याआधीच राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देऊन टाकला होता. प्रफुल पटेलांच्या त्या विधानानंतर राष्ट्रवादीला सुरुवातीचे काही दिवस प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका बजावता आली नाही किंवा त्यांच्याकडे विरोधी पक्ष म्हणून पाहिले गेले नाही. याचा काही प्रमाणात पक्षाला तोटा झाला.

- Advertisement -

मध्यंतरी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माय महानगरशी बोलताना प्रफुल पटेल यांच्या त्या विधानावर टीका केली होती. २०१४ चे ते विधान पक्षाला अपायकारक ठरले असून पवारांच्या परवानगीशिवाय पटेलांनी ते वक्तव्य केले असल्याचे आव्हाड म्हणाले होते. मात्र यावेळी पटेलांनी खबरदारी घेत जनतेला कौल भाजप-सेनेला मिळालेला असून त्यांना सत्ता स्थापनेसाठी शुभेच्छा असल्याचे सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -