घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटआज देशात १६ हजार ३११ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

आज देशात १६ हजार ३११ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

Subscribe

देशात १९ हजार २९९ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

देशात कोरोनाचे नवे १६ हजार ३११ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. नव्या रूग्णांची नोंद झाली असली तरी देशात १९ हजार २९९ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर गेल्या २४ तासात देशभरात १६१ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील तसेच राज्यातील कोरोना रूग्ण संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

आत्तापर्यंत देशात कोरोना रूग्णांची संख्या १ कोटी ४ लाख ६६ हजार ५९५ इतकी झाली आहे. भारतात आजच्या तारखेला एकूण २ लाख २२ हजार ५२६ एक्टिव्ह कोरोना केसेस आहेत. असे असले तरी देशाचा रिकव्हरी रेट हा सर्वात चांगला आहे. आतापर्यंत देशात १ कोटी ९२ हजार ९०९ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन सुखरूपपणे त्यांच्या घरी पोहचले आहेत. आता पर्यंत देशात १ लाख ५१ हजार १६० कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशातील कोरोनाबाधित रूग्णांचा संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. देशाचा रिकव्हरी रेटही दिवसेंदिवस वाढत आहे. देशात कोरोना लसीकरणालाही परवानगी देण्यात आली आहे. देशात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात ३ कोटी लोकांना कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे.

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -