घरCORONA UPDATECorona Live Update: राज्यात दिवसभरात ९७ रुग्णांचा बळी

Corona Live Update: राज्यात दिवसभरात ९७ रुग्णांचा बळी

Subscribe

कोरोना महामारीविषयी सर्व लाईव्ह अपडेट वाचा एका झटक्यात

दादर पोलीस ठाण्यातील एका ५१ वर्षीय पोलिसाला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या नायर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, दुर्दैवीने आज त्यांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी २ हजार रुग्ण सापडत आहेत. आजही राज्यात २ हजार ९१ कोरोना रुग्ण सापडले असून त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ५४ हजार ७५८ झाली आहे. तर राज्यात सध्या ३६ हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज राज्यात ९७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.


राज्यात आज दिवसभरात ९७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. आजपर्यंतचा हा सर्वात मोठा एका दिवसातला आकडा आहे. मात्र, मुंबईत देखील हा आकडा वाढता असल्याचं दिसून आलं आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ३९ रुग्णांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे मुंबईत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार ६५ इतकी झाली आहे. आज दिवसभरात मुंबईत एक हजाराहून जास्त रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतली एकूण रुग्णसंख्या आता ३२ हजार ७९१ झाली आहे. त्यासोबतच ४१० रुग्ण आज दिवसभरात आजारातून बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा आकडा देखील वाढून ८ हजार ८१४ झाला आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

केडीएमसीच्या आरोग्य विभागात कोरोनाचा शिरकाव

 

- Advertisement -
कल्याण डोंंबिवली मनपा क्षेत्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता कोरोनाने मनपाच्या आरोग्य विभागात शिरकाव केला आहे. एका कोविड योध्दा डॉक्टरला करोनाची लागण झाल्याने आरोग्य विभागाच्या प्रशाकीय यंत्रणेवरील ताण वाढत आहे. कोरोना संसर्गाला आळा बसण्यासाठी आरोग्य विभागासह प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असून कोरोना रूग्णाची वाढती संख्या प्रशासन  रोखण्यासाठी उपाययोजना करीत असले तरी  दिवसो दिवस कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे.
सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार; आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या कल्याण पश्चिमेत राहत असणाऱ्या डॉक्टरला गेल्या चार दिवसापासून ताप येत असल्याने होम काँरटाईन होते. त्यांची स्कँब चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता आरोग्य विभागात कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशाकीय यंत्रणेने आता आरोग्य विभागातील कर्मचारी यांना विशेष काळजी घेत सर्व सेफ्टी बाबीसह दक्षता घेऊन कोवीड योध्दाची काळजी घेणे गरजेचे आहे.

धारावीतील रुग्णांची संख्या होतेय कमी

धारावीमध्ये रुग्णांचे प्रमाण पुन्हा या आठवड्यात कमीवर आले आहे. सोमवारी धारावीत ४२ रुग्ण आढळून आल्यानंतर मंगळवारी या ठिकाणी ३८ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे धारावी लेबर कॅम्प येथील रुग्णांची संख्या मात्र कायमच आहे. लेबर कॅम्प येथे दिवसभरात आणखी ९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीत आता लेबर कॅम्पमधील परिस्थिती अद्यापही नियंत्रणात येताना दिसत नाही. आतापर्यंत लेबर कॅम्प येथे १५८ रुग्णांची एकूण संख्या झाली आहे. (सविस्तर वाचा)


महाराष्ट्रात करोनाचे ८० टक्के रुग्ण लक्षणे नसलेले आहेत अशी माहिती मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी दिली आहे. तसेच सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ३५ हजार १७८ रुग्ण आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. तर महाराष्ट्रात करोना रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण हे पाचवरुन १४ दिवसांवर आले आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.


कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे गोरगरीब-बेरोजगार-हातमजुर-लहानसहान कारखान्यात काम करणारे कामगार आदी तळागाळातील नागरिकांना उपासमारीच्या महाभयंकर संकटाला सामोरे जावे लागत आहे. हे विदारक चित्र बघून ओएनजीसी एससी-एसटी एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशनच्या एकवटलेल्या २१५ आजी-माजी अधिकारी-कमर्चारी यांनी १० लाख रुपयांची वर्गणी एकत्रित करून त्याद्वारे मिशन-सेवा सुरू केली आहे.


उल्हासनगरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या २००च्या वर

जिथे २० एप्रिलपर्यंत कोरोना पॉझिटिव्हचा ० रुग्ण असलेल्या उल्हासनगरात मे २५ तारखेला पॉझिटिव्ह रुग्णांनी २०० चा आकडा ओलांडला आहे. हॉटस्पॉट ठरवलेल्या परिसरात रुग्णांची सातत्याने वाढ होत असल्याने हा चिंतेचा विषय ठरला आहे. तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या कालावधीत २०  एप्रिल पर्यंत कोरोना पॉझिटिव्हचा तक्ता निरंक होता. त्यानंतर कॅम्प नंबर ५  मध्ये खार रुग्णालयात काम करणारा वार्डबॉय पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याचे लोण सर्व कॅम्प मध्ये पसरले असून सर्वाधिक रुग्ण सम्राट अशोक नगर, ब्राह्मणपाडा, खन्ना कंपाऊंड,आंबेडकर नगर चोपडा, गोलमैदान येथे मिळून आले असून जिथे कुठे पॉझिटिव्ह रुग्ण मिळून येताच पालिका आयुक्त समीर उन्हाळे यांच्या निर्देशानुसार सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी,अजय एडके,भगवान कुमावत, तुषार सोनवणे हे अधिकारी पोलीस बंदोबस्तात परिसर सील करून रुग्णांच्या नातलगांना क्वारंटाईन करण्याचे जबाबदारी बजावत आहेत.

राजभवनात राज्यपालांच्या भेटीसाठी दिग्गज नेत्यांच्या फेऱ्या वाढल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामूडींना वेग आला आहे. अशातच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद बोलावली. यावेळी फडणवीसांनी केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती आर्थिक मदत केली त्याची आकडेवारीनुसार माहिती दिली आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • आरोग्य, अन्न, मजूर, शेतकरी प्रत्येक घटकासाठी निधी
  • थेट अकाऊंटमध्ये ३ हजार ८०० कोटी रुपये जमा केले
  • महाराष्ट्रातून जवळपास ६०० रेल्वे गाड्या सोडल्या
  • जीएसटीचा नोव्हेंबरपर्यंतचा निधी राज्याला चुकता केला
  • कृषी सन्मान योजना, जनधन योजनेतूनही निधीचा पुरवठा
  • थेट अकाऊंटमध्ये ३ हजार ८०० कोटी रुपये जमा केले
  • केंद्र सरकारने राज्य सरकारला वेळोवेळी मदत केली आहे
  • श्रमिक रेल्वेसाठी ३०० कोटी केंद्र सरकारने दिली
  • महाराष्ट्राशी अन्याय होतोय अशी प्रतिमा तयार केली जात आहे
  • उज्जवला योजनेतून १ हजार ६०० कोटींचा निधी दिला
  • पीपीई किट आणि एन ९५ मास्कचा पुरवठा केंद्राने केला
  • केंद्राने राज्याला ४ हजार ५०० कोटींचा कर दिला
  • एप्रिल – मे महिन्याचा आगाऊ निधी केंद्राने दिला
  • महाराष्ट्रातून जवळपास ६०० रेल्वे सोडल्या
  • शेतीसाठी राज्याला ९ हजार कोटींचा निधी दिला
  • आरोग्य, अन्न, मजूर, शेतकरी प्रत्येक घटकासाठी निधी
  • थेट अकाऊंटमध्ये ३ हजार ८०० कोटी रुपये जमा केले

मागच्या दोन दिवसांपासून राज्य सरकार आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यात झालेल्या ट्विटयुद्धानंतर आज अखेर महाराष्ट्रातून १४५ ट्रेन धावणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.

 


मुंबईतील प्रसिद्ध अशा वडाळ्यातील जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षीचा गणेशोत्सव पुढे ढकलला आहे. फेब्रुवारी २०२१ पर्यंत गणेशोत्सव होणार नसल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

 


भारतात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा १ लाख ४५ हजारांच्या घरात पोहोचला आहे. तर एकूण अॅक्टिव्ह केसेस या ८० हजारांच्या आसपास आहेत. तर मृत्यूचा आकडा ४,१७२ वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ६० हजार रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मात्र तरिही महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीने भारताची डोकेदुखी वाढली आहे. महाराष्ट्रात तर झपाट्याने रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. तर गुजरात आणि दिल्लीमध्येही रुग्ण वाढत आहेत.

काल दिवसभरात गुजरातमध्ये ३९४ नवे रुग्ण आढळले त्यामुळे गुजरातमध्ये एकूण रुग्ण १४,४६८ झाले असून मृत्यूंची संख्या ८८८ आहे. तर दिल्लीत ५०८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या १४ हजारांच्या घरात पोहोचली आहे. तर २७६ मृत्यू झाले आहेत. तसं पाहिलं तर महाराष्ट्रानंत सर्वाधिक रुग्ण तामिळनाडूमध्ये आहेत. मात्र १७ हजार रुग्ण असलेल्या तामिळनाडूमध्ये केवळ ११९ मृत्यू झालेले आहेत. त्या तुलनेत गुजरात आणि दिल्लीमध्ये कोरोनाने जास्त कहर केल्याचे दिसून येत आहे.

26 May 8am Covid 19 cases

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -