घरमनोरंजनVideo: वडिलांच्या आठवणींना उजाळा; रितेशने केला डोळे पाणावणारा व्हिडीओ शेअर

Video: वडिलांच्या आठवणींना उजाळा; रितेशने केला डोळे पाणावणारा व्हिडीओ शेअर

Subscribe

विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त रितेशचा भावनिक व्हिडीओ होतोय व्हायरल

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज ७५ वी जयंती आहे. अभिनेता रितेश देशमुख याने आपल्या वडिलांच्या जयंतीनिमित्त एक भावनिक व्हिडीओ तयार केला असून तो त्याने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विलासराव देशमुख यांचे अस्तित्व अद्याप असून विलासरावांच्या पोषाखाला जवळ घेऊन रितेश ते जाणवून घेताना दिसतोय.

हा व्हिडीओ “अभी मुझमे कही बाकी है थोडीसी जिंदगी” या गाण्यावर असून व्हिडीओच्या शेवटी विलासराव देशमुख यांचा एक फोटो देखील दिसतोय. यासह विलासरावांसह रितेशचा एक पाठमोरा फोटोही आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तुमची नेहमी आठवण येते, असेही लिहिले आहे. सध्या हा व्हिडीओ रितेशच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला असून त्याचीच सर्वत्र चर्चा आहे.

- Advertisement -

संपुर्ण महाराष्ट्रासह रितेशचे देखील तितकेच विलासरावांवर प्रेम असल्याने रितेश नेहमीच आपल्या वडिलांच्या आठवणीना सोशल मीडियाच्या माध्यमातून उजाळा देत असतो. यावेळी वडिलांच्या जयंतीनिमित्त रितेशने हा भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. विलासराव देशमुख यांचे पुत्र रितेशसह  मंत्री अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख यांनीही ट्विटरवरुन वडिलांना आदरांजली वाहिली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -