पीडितेचा रुद्रावतार: बलात्काऱ्याला २५ वेळा चाकूने भोसकले

पीडितेचा रुद्रावतार: बलात्काऱ्याला २५ वेळा चाकूने भोसकले

एका पीडित महिलेने बलात्कार आणि धमक्या कंटाळून एका तरुणाची हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. ही पीडित महिला आरोपाला इतकी कंटाळी होती की, तिने रुद्रावतार धारण करून त्याच्यावर २५ वेळा चाकू भोसकून त्याला ठार केले. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील गुना शहरात घडली आहे.

महिला अल्पवयीन असल्यापासून तरुण करत होतात सतत बलात्कार

महिलेने केलेल्या आरोपानुसार, २००५ पासून तरुण सतत तिच्या बलात्कार करत होता. त्यावेळेस ती अल्पवयीन होती. पोलिसांच्या तपासातून मृत व्यक्तीचे नाव बृजभूषण शर्मा असे असल्याचे समोर आले आहे. हा मृत व्यक्ती अशोकनगर जिल्ह्यातील रहिवाशी होता. आरोपी महिला देखील अशोकनगरमधील होती.

महिलेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ती १६ वर्षांची होती तेव्हापासून बृजभूषण शर्माने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. त्यानंतर तरुणाने अनेक वेळा तिला धमकावून तिच्यावर जबरदस्ती केली. अखेरीस त्या महिलेने एका शिक्षकासोबत लग्न केले जेणेकरून बृजभूषण तिची पाठ सोडेल. लग्नानंतर तिला एक मुलगी झाली. परंतु त्यानंतर बृजभूषणने तिचा पाठलाग सोडला नाही.

घटनेच्या रात्री महिला घरी एकटी होती. त्यावेळेस बृजभूषण तिच्या घरी आला. तो नशेत होता आणि त्याने पुन्हा महिलेसोबत जबरदस्ती केली. यावेळेस महिलेचे संयम तुटला आणि तिने रुद्रावतार धारण करून त्याच्यावर चाकूने वार केले. यामध्ये तरुणाचा घटनास्थळी मृत्यू झाला. महिला तरुणाचे प्राण जाईपर्यंत त्याच्यावर चाकूने वार करतच होती. पण त्यावेळेस तो नशेत असल्यामुळे प्रतिकार करू शकला नाही.

तरुणाच्या मृत्यू झाल्यानंतर महिलेने स्वतः पोलिसांचा फोन करून आपण गुन्हा केल्याची कबूल दिली. महिलेच्या फोननंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा बृजभूषणचा मृतदेह नग्न अवस्थेत होता. याप्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.


हेही वाचा – जळगाव हादरलं! एकाच कुटुंबातील ४ अल्पवयीन मुलांची कुऱ्हाडीने गळा चिरुन हत्या