घरक्राइमधक्कादायक! नातवानं केलं आजीचं शिर अन् धड वेगळं; आणि...

धक्कादायक! नातवानं केलं आजीचं शिर अन् धड वेगळं; आणि…

Subscribe

नातवाला ड्रग्जचे व्यसन होते. त्यामुळे त्याचे मानसिक आरोग्य ढासळल्याने नातवाने आपल्या आजीची निर्घृण हत्या केली.

आजी-आजोबांचे आपल्या नातवासोबत अनोखे नातं असते. मात्र मुंबईतील वाद्रे परिसरात असा प्रकार घडला की तुम्ही देखील हैराण व्हाल. नातवाला ड्रग्जचे व्यसन होते. त्यामुळे त्याचे मानसिक आरोग्य ढासळल्याने नातवाने आपल्या आजीची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर त्याने आजीचे शिर कापून घरातील डायनिंग टेबलवर ठेवले. तर इतर अवयव घरात फेकून दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय ख्रिस्तोफर डायस हा आपली आजी रोझी डायस यांच्यासोबत राहत होता. त्याचे आई-वडील इस्रायलमध्ये असतात. काही दिवसांपूर्वीच वडील भारतात आले होते. ते कामानिमित्त गोव्यात गेले होते. ख्रिस्तोफर हा आजीसोबत राहात होता. त्याला ड्रग्जचे व्यसन होते. कायम नशेत असलेल्या ख्रिस्तोफरला एका नशामुक्ती केंद्रातही पाठवण्यात आले होते. तो तिथे १८ महिने राहिला. त्यानंतर तो घरी परतला होता. ख्रिस्तोफर हा आजीसोबत घरी होता. सोमवारी रात्री आजी झोपली होती. त्याचवेळी त्याने तिचा गळा चिरून हत्या केली. त्याने शिर कापून डायनिंग टेबलवर ठेवला. तसेच शरीराचे इतर अवयवही कापले आणि घरात फेकल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

नातवाने आजीचं शिर कापून ठेवलं डायनिंग टेबलवर

ख्रिस्तोफरने घडलेल्या घटनेनंतर आपल्या वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्याचे वडील तात्काळ मुंबईत आले. त्यांनी घराचा दरवाजा उघडला असता, आतील दृश्य बघून त्यांना धक्काच बसला. डायनिंग टेबलवर रोझी यांचे शिर ठेवले होते. तर घरात अवयव फेकलेले होते. याबाबत त्यांनी मुलाला विचारले असता, आजीचा खून केल्याचे त्याने हसत-हसत सांगितले.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपीला हत्येचे कारण विचारले असता, तो शांत राहिला. त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवल्यानंतर त्याला अटक केली. कोर्टात हजर केले असता, पोलीस कोठडी सुनावली आहे.


‘सिगारेट ओढ नाहीतर ठार मारेन!’; रुममेटच्या धमकीला कंटाळून तरुणाने केली आत्महत्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -