Saturday, August 8, 2020
Mumbai
28.6 C
घर देश-विदेश अरे देवा…! कोरोनाच्या भीतीपोटी वॉशिंग मशीनमध्ये धुतले १४ लाख रुपये

अरे देवा…! कोरोनाच्या भीतीपोटी वॉशिंग मशीनमध्ये धुतले १४ लाख रुपये

Mumbai
4 lakh washed in washing machine for fear of coronavirus

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नागरिकांनी कोरोनाचा चांगलाच धसका घेतला आहे. लोक चांगलीच सावधगिरी बाळगत असून त्याबतच्या काही घटना देखील समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एक महिला भाजी सॅनिटाईझरने धुतानाचा व्हिडीओ समोर आला होता. आता असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.

कोरोनाच्या भीतीपोटी एका व्यक्तीने असा प्रताप केला आहे की ज्यामुळे त्याला आर्थिक नुकसान सोसावं लागलं आहे. कोरोनाच्या भीतीने या व्यक्तीने चक्क १४ लाख रुपये वॉशिंग मशीनमध्ये धुतल्याचं समोर आलं आहे. दक्षिण कोरियामध्ये ही घटना घडली आहे. तिथल्या स्थानिक प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे.

दक्षिण कोरियामधील अंसन शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीने कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी स्वत: कडील सर्व रुपये वॉशिंग मशीनमध्ये टाकले आणि धुवून काढले. या व्यक्तीने तब्बल १४ लाख रुपये वॉशिंग मशीनमध्ये धुतले. यानंतर हे रुपये सुकविण्यासाठी ओव्हनमध्ये ठेवले. मात्र जास्त तापमानामुळे काही पैसे जळून गेले. त्यानंतर या जळालेल्या नोटा घेऊन हा व्यक्ती ‘बँक ऑफ कोरिया’मध्ये गेला आणि नोटा बदलून देण्याची मागणी करू लागला. त्याने केलेला प्रताप अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर ते हैराण झाले आणि डोक्याला हात लावला. मात्र बँकेने त्याला या नोटा बदलून दिल्या. त्याला १९ हजार ३२० डॉलरच्या नोटा बदलून दिल्या. बँकेचे अधिकारी वाउन यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, काही नोटा जास्तच खराब झाल्याने आम्ही त्या बदलून देऊ शकलो नाही. मात्र, इतर नोटा नियमानुसार बदलून देण्यात आल्या.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here