घरदेश-विदेशनव वर्षाच्या स्वागतासाठी जाणारी बोट उलटली; ९४ जणांचा मृत्यू

नव वर्षाच्या स्वागतासाठी जाणारी बोट उलटली; ९४ जणांचा मृत्यू

Subscribe

बोट दुर्घटनेमध्ये ९४ जणांचा बुडून मृत्यू झाला. ५५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. ज्यांचा मृत्यू झाला त्यामध्ये ६१ महिला आणि १९ बालकांचा समावेश आहे.

इराकमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. इराकच्या मोसुल शहरातील टिगरिस नदीमध्ये बोट उलटली. या दुर्घटनेमध्ये ९४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. बोटीमघील सर्व जण कुर्दिश समाजाचे होते आणि ते नौरौज या नव वर्षाच्या स्वागतासाठी जात होते. या बोटीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक जण बसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, इराकच्या पंतप्रधान अदेल अब्देल महदी यांनी तीन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा घोषीत केला आहे. याप्रकरणाच्या तपासाचा आदेश देण्यात आले आहे.

अशी घडली घटना 

गुरुवारी दजला नदीकाठाच्या शेजारी राहणारे कुर्दिश समाजाचे लोक नव वर्षाच्या स्वागतासाठी जात होते. मात्र, त्यांची बोट नदीच्या मध्यभागी आली असता उलटली. या दुर्घटनेमध्ये ९४ जणांचा बुडून मृत्यू झाला. ५५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. ज्यांचा मृत्यू झाला त्यामध्ये ६१ महिला आणि १९ बालकांचा समावेश आहे. दरम्यान, शोध मोहिम सुरु आहे. बोटीमध्ये क्षमते पेक्षा जास्त जण असल्याचे त्याचसोबत तांत्रिक बिघाड झाल्याचे देखील सांगितले जात आहे.

- Advertisement -

कंपनीविरोधात कारवाईचे आदेश

इराकमध्ये आताच जिहादी हल्ला आणि युध्दामध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला होता. अशा प्रकारच्या घटना घडण्याचे प्रकार इराकमध्ये सुरुच असतात. इराकच्या कायदे मंत्रालयाने ज्या कंपनीची ही बोट होती त्या कंपनीच्या ९ अधिकाऱ्यांच्या अटकेचे आदेश दिले आहेत. या बोट दुर्घटनेला इराकमधील सर्वात मोठी दुर्घटना असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -