घरदेश-विदेशपॉर्नस्टार्स बनले पॉप कल्चरचा एक भाग

पॉर्नस्टार्स बनले पॉप कल्चरचा एक भाग

Subscribe

केरळमधील बसवर पॉर्नस्टार्सची चित्रे बनवल्याने ही बस ठरली सर्वात वेगळी. सनी लिओनी आणि मिया खलीफाच्या चित्रांचा सहभाग.

साधारणतः रस्त्यांवर धावणाऱ्या बसेसवर बॉलिवूडस्टार, देवाचे किंवा मुलांच्या नावाचे स्टिकर्स लावल्या जातात. मात्र केरळ येथील एका बसवर चक्क पॉर्नस्टार्सची चित्रे काढण्यात आली आहेत. कॉलेजमधील मुलांची वाहतूक करण्यासाठी बसचा वापर केला जातो. बसवर काढण्यात आलेल्या चित्रांमध्ये माजी पॉर्नस्टार्सच्याही फोटोंचा समावेश करण्यात आला आहे. परदेशी पॉर्नस्टार्ससह भारतीय पॉर्नस्टार्सचीही चित्रे बसवर दिसतात. एव्हा अॅडम्स, जॉनी सिन्स, केअरॅन ली, जॉर्डी आणि माजी पॉर्नस्टार्स मिया खलीफ व सनी लिओनी यांचीही चित्रे बसवर बघायला मिळतात. बसचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तीला बघण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.

कोण आहे बसचे मालक?

ही बस केरळयेथील ‘चिककोस टूर्स अॅण्ड ट्रेवल्स’ या खाजगी कंपनीची आहे. तिरुवनंतपुरम येथील ‘शेरिल’ यांच्या मालकीची हे टेव्हल्स आहे. बंगळुरू, हैद्राबाद, म्हैसूर आणि इतर ठिकाणी ही बस कॉलेजमधील मुलांची वाहतूक करते. चित्रा व्यतिरीक्तही या बसमध्ये ईतर सुविधाही आहेत. या बाबत सांगतांना मालक शेरिल म्हणाले की,”बसमध्ये नीऑन लाइट्स,डिस्को-लाईट आणि हाय म्युझिक सिस्टिम आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांचे मनोरंजन व्हावे म्हणून काळजी घेण्यात आली आहे. बसमधील लाईटिंग म्यूझिकप्रमाणे बंद चालू होते. त्यामुळे या बसमधून प्रवास करणाऱ्यांना ही बस आवडते. नेते, अभिनेते आणि खेळाडू यांची चित्रे आपण नेहेमीच बसेसवर बघतो. मात्र पॉर्नस्टार्सला फक्त आपण बघतो पण त्यांचे चित्र कोणीच गाड्यांना लावत नाही. पॉर्नस्टार सर्व वयोगटातील लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत.”

- Advertisement -

 

- Advertisement -
porn-bus
बसच्या मागचा भाग

प्रसिद्ध पार्नस्टार्सची चित्र असलेल्या बसचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर टाकण्यात आले होते. या फोटोंना पोर्नस्टार ‘केरान ली’द्वारे रिट्विट करण्यात आले आहे. पॉर्नस्टारव्यतिरीक्त कंपनीने हॉलिवूड चित्रपटातील ‘सुपरहिरोज’ची चित्रे अन्य गाड्यांवर लावली आहे. एव्हेंजर्स आणि पायरट्स ऑफ द कॅरिबियन या चित्रपटातील नायकांची चित्रेही आपल्याला या कंपनीच्या बसेसवर बघायला मिळतात. ही चित्रे थ्रिसूर येथील व्यंगचित्रकार रितेशने काढली आहे. जून महिन्यात ही चित्रे काढण्यात आली असून आतापर्यंत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

porn-bus
बसच्या मागचा भाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -