हैदराबाद घटनेनंतरही देशात बलात्कारांचे सत्र सुरुच

हैदराबाद येथील पाशवी बलात्काराच्या घटनेनंतरही देशभरात संतापाची लाट उसळलेली असताना देखील अशाप्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत.

Mumbai
After the Hyderabad incident rape sessions begin in the country
हैदराबाद घटनेनंतरही देशात बलात्कारांचे सत्र सुरुच

हैदराबाद येथील निर्भया वरील सामूहिक बालात्काराचे प्रकरण ताजे असतानाच ओडिशामध्ये आणि छत्तीसगडमध्ये देखील अशाच काही सामूहिक बलात्काराच्या घटना घडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. हैद्राबाद येथील पाशवी बलात्कार घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळलेली असताना देखील अशाप्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत, ही एक लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे या घटनांवर गांभिर्याने विचार केला जायला हवा आणि आरोपींना ताबोडतोब शिक्षा व्हावी, अशी भूमिका सर्वसामान्य जमनतेकडून मांडली जात आहे.


हेही पाहा –#Justiceforpriyankareddy प्रियांका रेड्डी बलात्काराप्रकरणी मुंबईकरांचा संताप


ओडिशात पोलीस कॉन्स्टेबलकडूनच बलात्कार

हैदराबाद येथील सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना ओडिशामध्ये देखील सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपींमध्ये एका माजी पोलीस कॉन्स्टेबलचाही समावेश आहे. त्याने इतर सहकाऱ्यांसोबत मिळूण तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. पीडित तरुणी बसस्टॉपवर बसची वाट पाहत उभी होती. ती आपल्या गावी जात होती. मात्र, चार जणांनी तिला मदत करण्याचे भासवले. त्यातील एकाने आपण पोलीस असल्याचे सांगत तरुणीची फसवणूक केली. त्या नराधमांनी पीडितेला कारमधून पुरी येथील सरकारी निवासस्थानी नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दरम्यान, पीडितेच्या हाती पोलीस कॉन्स्टेबलचे पाकीट आणि ओळखपत्र लागले आहे. याप्रकरणी पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली.


हेही वाचा – हैदराबाद बलात्कार प्रकरण: माझ्या मुलाला जाळून टाका – आरोपीची आई


छत्तीसगडमध्येही अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

छत्तीसगडच्या बिलासपूर येथे देखील सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. ही घटना १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत घडली आहे. दोन नराधमांनी मिळून हे कृत्य केले असून पीडितेला त्यांनी मारहाण केल्याची देखील घटना उघडकीस आली आहे. छत्तीसगडच्या पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. पीडित तरुणीवर रुग्णालयात उपार सुरु असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.