फेसबुकचे भारतात मार्केटिंगसाठी नवे धोरण!

Mumbai
All political parties are spending crores of money on advertising

सोशल मिडीयावरची सगळ्यात जास्त ख्यातनाम असलेली फेसबुक कंपनी ही भारतात मार्केटींगवर अधिक भर देणार असल्याचे दिसतंय. फेसबुकने अविनाश पंत यांची मार्केटींग प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता फेसबुकच्या इतर अॅपवरील मार्केटींवर देखरेख ठेवण्याची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

अविनाश पंत यांच्याकडे २२ वर्षाचा अनुभव असून याआधी त्यांनी रेडबुलचे भारतातील मार्केटींग प्रमुख म्हणून अखेरची जबाबदारी पार पाडली होती. पंत यांनी यापूर्वी नायकी, कोकाकोला, दी वॉल्ट डिज्नी कंपनी तसेच रेडबुल यांसारख्या प्रसिद्ध कंपन्यात त्यांनी काम केले आहे.

मार्केटींग प्रमुख (विपणन संचालक) हे फेसबुक कंपनी करीता नवे पद असणार आहे. पंत आयआयएम अहमदाबाद येथून उत्तीर्ण झाले आहेत, यापढे आपल्या सर्व कामाचा आढावा ते फेसबुकचे व्यवस्थापकीय संचालक असलेले अजित मोहन यांच्याकडे देतील.