‘५ एकर जमिनीची खैरात नको’

'कोर्टाच्या निकालावर नाराजी व्यक्त करू नये का?'

Mumbai
ओवेसी

अयोध्येतील निकालानंतर सर्वच स्तरातून स्वागत केले जात असताना ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लमिन (एआईएमआईएम) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालावर नाराजी व्यक्त केली जात आहे. ‘आजचा निकाल म्हणजे सत्यावर आस्थेचा विजय आहे. तसेच मुस्लिम पक्षकारांनी जमिनीची ऑफर नाकारावी, पाच एकर जमिनीची खैरात नको’, असे वक्तव्य करत ओवेसींनी नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच, राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल जाहीर केला. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्यात यावे, तर मशिदीसाठी मोक्याच्या ठिकाणी पाच एकर जागा देण्यात येईल, असा निर्णय घटनापीठाकडून एकमताने देण्यात आल्यानंतर मशिदीसाठी मोक्याच्या ठिकाणी देण्यात आलेली पाच एकरची जागा नाकारली.

या निकालावर बोलतांना ओवेसेंची कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत असताना संघावर देखील निशाणा साधला आहे. यावेळी आम्ही बाबरी मशिदीला आम्ही विसरावं का? तसेच कोर्टाच्या निकालावर नाराजी व्यक्त करू नये का?, असा प्रश्नदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच, ‘जर बाबरी मशीद पाडली गेली नसती, तर सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला असता? सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असला तरी अचूक नाही. ही लढाई कायदेशीर हक्कासाठी होती. पाच एकर जमिनीची भीक नको,’ अशी भूमिका ओवेसी यांनी मांडली आहे.