घरट्रेंडिंगVideo: बाळाला पाठीवर बांधून 'तिने' दिल्या बातम्या

Video: बाळाला पाठीवर बांधून ‘तिने’ दिल्या बातम्या

Subscribe

आपल्या बाळाला पाठीला बांधून त्याच उत्साहाने न्यूज बुलेटिन सादर करणाऱ्या, या महिला अँकरचं जगभरातून कौतुक केलं जात आहे.

आपल्या बाळाला पाठीवर बांधून इंग्रजांशी दोन हात करणारी, निडरपणे लढणारी ‘राणी लक्ष्मीबाई’ आजही आपल्या स्मरणात आहे. मात्र, आधुनिक काळातील अशीच एक झाशीची राणी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे. अमेरिकेतील एका महिला न्यूज अँकरने आपल्या मुलाला  चक्क पाठीला बांधून, बातम्या दिल्याचा अनोखा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सध्या इंटरनेटवर व्हायरल होतो आहे. आपल्या बाळाला पाठीला बांधून, त्याच उत्साहाने न्यूज बुलेटिन सादर करणाऱ्या या महिला अँकरचं जगभरातून कौतुक केलं जात आहे. युनायटेड स्टेट्समधील Minnesota या चॅनेलची ही महिला अँकर असून, सुशी मार्टिन असं तिचं नाव आहे. दरम्यान  सुशी हवामान विशेष बुलेटिन सादर करण्यासाठी जेव्हा स्टुडिओमध्ये आली, तेव्हाच तिने आपल्या २१ महिन्यांच्या बाळाला पाठीवर बांधलं होतं. याच अनोख्या बुलेटिनचा खास व्हिडिओ :

काय होतं यामील कारण? 

याविषयी सुशी मार्टिनला विचारणा केली असता ती सांगते, ‘मी हे करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे अमेरिकेत सुरु असलेला International ‘Babywearing’ Week. हा खास विक सेलिब्रेट करण्यासाठी मी हा अनोखा उपक्रम राबवला’. ‘मी माझ्या बाळाला कापडाने पाठीवर बांधलं आहे’, असं मार्टिन बुलेटिनच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना सांगते आणि हवामानाचं वृत्त द्यायला सुरुवात करते. संपूर्ण बुलेटिनमध्ये ती बर्फवृष्टी, तापमान आणि एकंदर हवामानाविषयी माहिती देते. दरम्यान, ‘माझा हा व्हिडिओ काम आणि परिवार सांभाळू इच्छिणाऱ्या महिलांसाठी प्रेरणादायी ठरला, तर ती माझ्यासाठी समाधानाची बाब ठरेल’, असं मार्टिन म्हणते. ‘मी माझं काम आणि माझं कुटुंब या दोघांवरही तितकंच प्रेम करते’, असंही मार्टिन सांगते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -