घरदेश-विदेशदेशभरात आज बकरी ईदचा उत्साह

देशभरात आज बकरी ईदचा उत्साह

Subscribe

ईदनिमित्त काश्मीरमधील निर्बंध हटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज देशभरामध्ये ईदचा उत्साह पाहायला मिळत असून सर्वत्र बकरी ईद साजरी केली जात आहे. दरम्यान ईदनिमित्त काश्मीरमधील निर्बंध हटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ईदच्या पूर्वसंध्येला काश्मीरसह खोऱ्यातही रविवारी बाजारपेठा खुल्या करण्यासाठी परवानगी दिली होती. ईदच्या पूर्वसंध्येला बाजारांमध्ये जोरदार तयारी बघायला मिळाली.

- Advertisement -

…म्हणून हा सण साजरा केला जातो

पैगंबर आणि हजरत मोहम्मद यांचे पूर्वज हजरत इब्राहिम यांच्या बलिदानाची आठवण म्हणून मुस्लिमांमध्ये ईदचा सण साजरा केला जातो. असे म्हटले जाते की, अल्लाहने इब्राहिमची परीक्षा घेण्यासाठी त्याच्या प्रिय वस्तूचा त्याग करण्यास सांगितले आणि यानंतर इब्राहिमने आपल्या लहान मुलाचे बलिदान देण्याचे ठरविल्यामुळे अल्लाहने त्याला थांबवले.

- Advertisement -

ईदनिमित्त काश्मिरात निर्बंध शिथिल होणार

केंद्र सरकारने सोमवारी संसदेत विधेयक मांडत ३७०वे कलम हटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधीपासूनच जम्मू-काश्मीरमधील बंदोबस्त वाढविण्यात आला होता. गेल्या काही दिवसात अनेक भागांमध्ये निर्बंध लादण्यात आले होते.

सगळ्या ठिकाणीच आज बकरी ईद साजरी करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर, सरकारने रविवारी तेथील निर्बंध थोडेफार शिथिल केले होते. काश्मीर खोऱ्यामध्ये नागरिकांना मशिदीमध्ये ईदची नमाज अदा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच, मोबाइल व इंटरनेटवरील निर्बंध लवकरात लवकर शिथिल करण्यात येतील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. रविवार असून, बँका व बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या होत्या.

ईदच्या पूर्वसंध्येला काश्मीरात रविवारी बाजारपेठा खुल्या

ईदच्या पूर्वसंध्येला काश्मीरसह खोऱ्यातही रविवारी बाजारपेठा खुल्या करण्यासाठी परवानगी दिली होती. ईदच्या पूर्वसंध्येला बाजारांमध्ये जोरदार तयारी बघायला मिळाली. यावेळी मुस्लिम बांधवांनी बाजारात खरेदी देखील केली. ईदच्या आधी बाजारपेठांमध्ये गर्दी उसळली होती आणि मुस्लिम समाजातील लोकांनी सर्व खाद्यपदार्थांची खरेदी केली आहे.

त्यामुळे श्रीनगरसह सर्व प्रमुख रस्ते माणसांच्या गर्दीने पाहायला मिळाले. बकरी ईदनिमित्त सरकारने काश्मीर खोऱ्यामध्ये नागरिकांना मशिदीत ईदचा नमाज अदा करण्याची परवानगी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -