‘मुस्लिमांनो, मतं द्या, नाहीतर कामं करणार नाही’; मनेका गांधींची ‘वाचाळपंती’!

भाजपच्या केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी मुस्लिम मतदारांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Sultanpur
Maneka Gandhi
मनेका गांधी

देशात निवडणुकांचं वातावरण असताना भाजपकडून आक्रमकपणे प्रचार केला जात आहे. मात्र, भाजपच्याच काही नेत्यांकडून गंभीर आणि वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. केद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी नुकत्याच एका प्रचारसभेत केलेल्या वक्तव्यामुळे मतदानाच्या तोंडावर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पिलीभीतमधून भाजपच्या खासदार असलेल्या मनेका गांधी यांनी सुलतानपूरमधून त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली. गुरुवारी याच प्रचारसभेत बोलताना मनेका गांधींनी मुस्लिम समाजाविषयी केलेल्या वक्तव्यावरून आता चर्चा सुरू झाली आहे. या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

काय म्हणाल्या मनेका गांधी?

या सभेत बोलताना मनेका म्हणाल्या, ‘मी जिंकत आहे. पण जर माझा विजय मुस्लिम मतांशिवाय झाला, तर मला वाईट वाटेल. आणि मग जेव्हा मुस्लिम मतदार माझ्याकडे कामासाठी येतील, तेव्हा मी म्हणेन असू द्या आता. कारण आपण काही महात्मा गांधींचे वारसदार नाहीत की कोणत्याही अपेक्षेशिवाय फक्त देत जाऊ. माझा विजय तुमच्या सोबत किंवा तुमच्या शिवाय, पण होणारच आहे’, असं मनेका गांधी म्हणाल्या. ‘जर तुम्ही मला मत दिलं नाही आणि नंतर पुन्हा माझ्याकडे कामासाठी आलात, तर तुमचं काम होणार नाही’, असं धक्कादायक विधान मनेका गांधी यांनी यावेळी बोलताना केलं.

मायावतींवरही केली होती टीका

दरम्यान, अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी मनेका गांधींनी बसपच्या अध्यक्षा मायावती यांच्याविषयी देखील मनेका गांधी यांनी केलेल्या टीकेमुळे वाद निर्माण झाला होता. मनेका गांधींनी मायावतींना उमेदवारांच्या ‘तिकिटांच्या दलाल’ असं म्हणून वाद ओढवून घेतला होता. आता या वक्तव्यामुळे पुन्हा वाद होऊ शकतो. अशाच वादग्रस्त वक्तव्यावरून निवडणूक आयोगाने गुरुवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांना नोटिसा पाठवल्या आहेत. ‘तुमचा अली तर आमचा बजरंग बली’ असं वक्तव्य योगी आदित्यनाथांनी केलं होतं. मायावतींनी देखील धर्माच्या नावावर मतं मागितली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here