घरदेश-विदेशनागरिकत्व दुरुस्ती कायद्या विरोधात विद्यार्थ्यांचे हिंसक आंदोलन; विद्यापीठ ५ जानेवारीपर्यंत बंद

नागरिकत्व दुरुस्ती कायद्या विरोधात विद्यार्थ्यांचे हिंसक आंदोलन; विद्यापीठ ५ जानेवारीपर्यंत बंद

Subscribe

नागरिकत्व दुरुस्ती कायद्या विरोधात अलीगड विद्यापीठातही विद्यार्थांनी हिंसक आंदोलन केले असून यापार्श्वभूमीवर विद्यापीठ ५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर ईशान्य भारतात या कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचे रुपांतर आता हिंसाचारात झाले असून आंदोलकांनी जाळपोळ करायला सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यापासून ईशान्य भारतातील आसाम, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीमसह सात राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी मालमत्तेचे नुकसान आंदोलकांकडून केले जात आहे. सरकारी बस सर्रासपणे जाळल्या जात आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात पेटलेली ही आग आता दिल्लीतही पोहोचली आहे. रविवारी दुपारी काही आंदोलक विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करत तीन बस पेटवून दिल्या. तसेच दगडफेक देखील करण्यात आलीय या गोंधळानंतर परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी ५ जानेवारीपर्यंत विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्मण प्रशासनाने घेतला आहे.

लाठीजार्जमध्ये ६० हून अधिक विद्यार्थी

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार; शेकडो आंदोलक विद्यार्थी अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचा बाब-ए-सर सय्यद गेटवर एकत्र जमले होते. ठिकठिकाणी लावलेले बॅरिगेट्स विद्यार्थ्यांनी तोडून टाकले आणि दगडफेक करण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांना शांत करण्यासाठी पोलिसांनी देखील लाठीचार्ज करत अश्रूधूराच्या नळकांड्यांचाही वापर केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या लाठीजार्जमध्ये ६० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले असून जखमींना नेहरु मेडिकल कॉलेज ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

गेल्या तीन दिवसांपासून जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. आंदोलक विद्यार्थ्यांनी तीन बस आणि काही दुचारी पेटवून दिल्या. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सध्या परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आली असल्याची माहिती समोर येत आहे.


हेही वाचा – ‘मी पण सावरकर’ भगव्या टोप्या घालून भाजपचे आमदार आक्रमक


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -