CoronaVirus: चीनला भारी किंमत मोजावी लागेल; ट्रम्प यांची पुन्हा एकदा धमकी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काहि दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयात तीन दिवस उपचार घेतल्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतर ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनला धमकी दिली आहे. कोरोना महामारीसाठी ट्रम्प यांनी चीनवर ठपका ठेवताना चीनने जगासोबत जे काही केलं आहे, त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, असं मोठं विधान ट्रम्प हाऊसमधून देशाला संबोधताना केलं.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, कोरोना ही चीनची चूक आहे आणि चीनने या देशासाठी आणि जगासाठी जे केले आहे त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, अशी धमकी ट्र्म्प यांनी दिली. दरम्यान, आपल्या एका व्हिडीओ संदेशात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाची लागण हे ‘देवाचे आशीर्वाद’ आहेत, असं म्हटलं होतं. यावेळी त्यांनी रेजेनरॉन औषधाचा उल्लेख केला. हे औषध खूप चांगलं आहे. हे औषध लोकांमध्ये वितरीत केलं जात आहे, असं ट्र्म्प यांनी सांगितलं.

अमेरिकेत निवडणुकीची रणधुमाळी

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जवळ आली आहे. रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्र्म्प तर डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार माजी उपाध्यक्ष जो बायडन यांच्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये समोरासमोर चर्चा सत्र सुरु आहेत. आतापर्यंत झालेल्या चर्चांमध्ये जो बायडेन यांचं पारडं जड राहिलं आहे.