घरदेश-विदेशCoronavirus: हिवाळ्यात कोरोना अधिक धोकादायक होणार? जाणून घ्या तज्ज्ञांची मते

Coronavirus: हिवाळ्यात कोरोना अधिक धोकादायक होणार? जाणून घ्या तज्ज्ञांची मते

Subscribe

जगभर थैमान घाणारा कोरोना विषाणू उन्हाळ्यात कमी होईल अशी शक्यता अनेकांनी वर्तवली होती. परंतु, कोरोनाचा या काळात उद्रेक झाला. त्यामुळे आता हिवाळ्यात कोरोनाचा उद्रेक होतो की आटोक्यात येतो, याकडे सर्वांचं लक्ष आहे. WHO ने स्पष्ट केलं आहे की, कडाक्याच्या थंडीमुळे कोरोना संपणार नाही. यावर तज्ज्ञ आपापलं मत व्यक्त करत आहेत.

हिवाळ्याच्या हंगामात बहुतेक हंगामी विषाणू सक्रिय होतात. उदाहरणार्थ, जगातील बर्‍याच भागात हिवाळ्यामध्ये इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढतो. भारतात हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. तथापि, कोरोनामध्ये आतापर्यंत कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही. विषाणूमुळे होणारे रोग, विशेषत: श्वसन प्रणालीशी संबंधित आजार थंड तापमानात वाढतात. हे सर्व जगभरात आहे. हेच कारण आहे की फ्लू विषाणूमुळे होणारे बहुतेक मृत्यू हिवाळ्यात होतात. हिवाळ्यात कोरोना विषाणू तीव्र होण्याची भीती तज्ज्ञांना वाटत आहे. तथापि, अद्याप कोरोनाचा तापमानाशी कोणताही संबंध आला नाही.

- Advertisement -

काही तज्ज्ञांचं मत आहे की सहा ऋतूंचा देश असलेल्या भारतामध्ये जून ते सप्टेंबर या महिन्यात इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढतो, हिवाळ्यामध्ये नाही. अशा परिस्थितीत येत्या काही महिन्यांत कोविड -१९ चा उद्रेक होण्याची शक्यता कमीच आहे. दुसरीकडे, पाश्चिमात्य देशांत कडाक्याच्या थंडीमुळे लोक घरातच राहतात. अशा परिस्थितीत, एकाच ठिकाणी राहणाऱ्या लोकांमध्ये व्हायरस पसरण्याचा धोका वाढतो. व्हायरोलॉजिस्टच्या मते, भारतात असं नाही. ते म्हणतात की भारतात हिवाळ्यामध्ये देखील लोक घराबाहेर पडतात. २००९ पासून H1N1 स्वाइन फ्लू विषाणूंमुळे त्रस्त असलेल्या महाराष्ट्रासारख्या राज्यात मान्सून व हिवाळ्यात हळूहळू वाढ झाली आहे. परंतु पावसाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात फक्त निम्मी वाढ झाली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -