घरदेश-विदेशCoronavirus: चीन, इटलीपेक्षा स्पेनमध्ये सर्वाधिक कोरोना बाधित रूग्ण

Coronavirus: चीन, इटलीपेक्षा स्पेनमध्ये सर्वाधिक कोरोना बाधित रूग्ण

Subscribe

कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या आकडेवारीत चीन आणि इटलीपेक्षाही स्पेन सर्वाधिक पुढे

संपूर्ण जग हा कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. कोरोनाचा कहर हा जगभरात दिसत असून मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात साधारण १२ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर ७० हजार लोकांचा बळी या भयावह कोरोनाने घेतला असताना २ लाख ६२ हजार लोक या कोरोना व्हायरसपासून मुक्त होऊन घरी परतले आहेत. मात्र यामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या आकडेवारीत चीन आणि इटलीपेक्षाही स्पेन सर्वाधिक पुढे आहे.

अमेरिकेनंतर स्पेन दुसऱ्या स्थानावर

तसेच, आतापर्यंत अमेरिकेत साधारण दहा हजार लोकांचा मृत्यू झाला असून स्पेनमध्ये एकूण १ लाख ३१ हजार ६४६ , इटलीमध्ये १ लाख २८ हजार ९४८ एवढे कोरोनाग्रस्त आहेत. त्यामुळे स्पेन हे युरोपमधील कोरोना व्हायरसचे केंद्रच बनले आहे. या सर्व आकडेवारीवरून जगभरात अमेरिका या देशानंतर स्पेन हा दुसऱ्या स्थानावर आहे.

- Advertisement -
CoronaVirus: कोरोना लढाई; अमेरिकेचे भारताला २९ लाख डॉलर अनुदान!

सध्या एकूण ३ लाख ३६ हजार ८३० कोरोनाग्रस्त अमेरिकेत असले तरी कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा बळी हा इटलीमध्ये गेला आहे. सध्या इटलीमधील मृत व्यक्तींची संख्या १५ हजार ८८७ वर पोहोचली आहे. इटली नंतर स्पेनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे १२ हजार ६४१ लोकांचा बळी गेला आहे, अशी माहिती वॉशिंग्टनमध्ये असलेल्या जॉन्स हॉपकिंस युनिवर्सिटीमध्ये सीएसएसईने दिली.

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या १३ लाखांवर

आतापर्यंत जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या १३ लाख ६१ हजार ६५७वर पोहोचली आहे. यापैकी ७० हजार ६३० कोरोना रुग्णांचे बळी गेले आहेत. तसंच २ लाख ६९ हजार ६५६ कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. जगभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे अमेरिकत आढळले आहे. अमेरिका आतापर्यंत ३ लाख ३६ हजार ९०६ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -