Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश गाझियाबादमध्ये भीषण अपघात; छत कोसळून १८ जणांचा मृत्यू

गाझियाबादमध्ये भीषण अपघात; छत कोसळून १८ जणांचा मृत्यू

अंत्यविधीसाठी आलेल्यांवर काळाचा घात

Related Story

- Advertisement -

उत्तरप्रदेशच्या गाझियाबादमध्ये स्मशानभूमीचे छत कोसळून तब्बल १८ जणांचा मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली आहे. गाझियाबादमधील मुरादनगरच्या स्मशभूमीत एका पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या अंगावर या स्मशानभूमीचे छत कोसळले. या छताखाली दबले जात १८ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावेळी १०० हून अधिक लोक या छताखाली थांबले असल्याची माहिती मिळत आहे.

याप्रकरणी मेरठचे विभागीय आयुक्त अनिता सी मेश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला असून ३८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून बचाव कार्य सुरु आहे. परंतु मुसळधार सुरु असलेल्या पावसामुळे बचाव पथकाला अनेक अडचणी येत आहेत. यात मृत्यू झालेल्या १८ जणांमध्ये अद्याप तिघांचीच ओळख पटली आहे. योगेंद्र, बंटी, ओंकार अशी या ओळख पटलेल्या मृतांची नावे असून तिघेही संगम विहार आणि मुरादनगरमधील रहिवासी आहेत. या मृतांच्या कुटुंबियांना २ लाखांची आर्थिक मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

- Advertisement -

फळविक्रेत्याच्या अंत्यसंस्कारासाठी लोक स्मशानभूमीत आले होते. मात्र अंत्यसंस्कारावेळी पाऊस पडत असल्याने लोकांनी छताचा आसरा घेतला होता. यावेळी या छताचे बांधकाम सुरू होते. मुसळधार पावसामुळे हे छत खाली कोसळले आणि त्यात अंत्यसंस्कारासाठी आलेले लोक दबले गेले.

या घटनेची मुख्यमंत्री योगीआदित्यनाथ यांनी गंभीर दखल घेत प्रभावी पद्धतीने बचावकार्य चालवण्याचे निर्देशही  जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाला दिले आहेत. उत्तर प्रदेशातील औद्योगिक शहर आणि दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये ही दुर्घटना घडली आहे. मुरादनगरच्या स्मशानघाट परिसरात लिंटरचे बांधकाम सुरू होते. यावेळी पाऊस आल्याने लिंटर खाली कोसळले. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

 


हेही वाचा –ऐकावं ते नवलच! राजस्थानमध्ये पोलीस कबुतरांच्या शोधात

- Advertisement -