सिद्धूचा शिरच्छेद करणाऱ्याला १ कोटी इनामाची घोषणा

'नवज्योत सिंग सिद्धू यांचा शिरच्छेद करा, आणि १ कोटी रूपये बक्षीस म्हणून घेऊन जा' अशी घोषणा हिंदू युवा वाहिनीने केली आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अपमान केल्यानं हिंदू युवा वाहिनीने ही घोषणा केली आहे.

Delhi
My Pakistan visit is the sign of good relationship between India and Pak says navjot singh sidhu
नवज्योत सिंग सिंद्धू

‘नवज्योत सिंग सिद्धू यांचा शिरच्छेद करा, आणि १ कोटी रूपये बक्षीस म्हणून घेऊन जा’ अशी घोषणा हिंदू युवा वाहिनीने केली आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अपमान केल्यानं हिंदू युवा वाहिनीने ही घोषणा केली आहे. हिंदू युवा वाहिनीने आणि योगी आदित्यनाथ यांचे संबंध आहेत. कारण, योगी आदित्यनाथ यांनीच हिंदू युवा वाहिनीची स्थापना केली आहे. हिंदू युवा सेनेचे आग्रा मधील प्रमुख तरूण सिंग यांनी ही घोषणा केली. सिद्धूचे शीर धडा वेगळे करा आणि १ कोटी इनाम घेऊन जा असं सिंग यांनी म्हटलं आहे. यावेळी नवज्योत सिंग सिद्धूविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभेच्या प्रचारादरम्यान सिद्धू यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर हिंदू युवा वाहिनीने ही घोषणा केली आहे.

वाचा – माझ्या पाकिस्तान जाण्याने भारत-पाक संबध मजबूत – सिद्धू

काय आहे प्रकरण

राजस्थानमधील विधानसभा निवडणुक प्रचारादरम्यान नवज्योत सिंग सिदधू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. यावेळी सिद्धू यांनी, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला देशाचे चौकीदार म्हणवून घेतात. मात्र, ते इमानदार नाहीत. चौकीदार चोर आहे, तर योगी आदित्यनाथ हे सर्वात मोठे भोगी आहेत’ अशा शब्दात सिदधू यांनी दोन्ही नेत्यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर हिंदू युवा वाहिनीने नवज्योत सिंग सिद्धू यांच्या शिरच्छेदाची घोषणा केली आहे. शिवाय, शिरच्छेद करणाऱ्याला एक कोटीच्या इनामाची देखील घोषणा केली आहे. नवज्योत सिंग सिद्धू आपल्या देशाबाबत, इथल्या नेत्यांबाबत चुकीची वक्तव्ये करणं थांबवावं. देश आणि माणसं पटत नसतील तर त्यांनी पाकिस्तानला जावे असा इशारा देखील हिंदू युवा वाहिनीने दिला आहे. यावर आता सिद्धू काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.

वाचा – सिद्धू पुन्हा वादात; ‘मिठी’ नंतर आता ‘फोटो’