दीपक कोचर पॉझिटिव्ह; चौकशी करणारे ED अधिकारी, वकील क्वारंटाईन

आयसीडीआय बँकेचे माजी सीएमडी चंदा कोचर यांचे पती दीपक यांना गेल्या आठवड्यात ७ सप्टेंबर रोजी ईडीने अटक केली होती.

आयसीआयसीआय बँकेचे माजी सीएमडी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर येत आहे. दीपक यांना कोरोनाला संसर्ग झाल्यानंतर, त्यांना अटक करण्यासाठी गेलेल्या प्रवर्तन निदेशालय (ईडी) चा अधिकारी आणि वकील यांनी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन केले आहे. गेल्या आठवड्यात दीपक कोचर यांना अटक करण्यात आली होती.

आयसीडीआय बँकेचे माजी सीएमडी चंदा कोचर यांचे पती दीपक यांना गेल्या आठवड्यात ७ सप्टेंबर रोजी ईडीने अटक केली होती. दीपक यांनी कंपनीत केलेल्या गुंतवणूकीबद्दल आयसीआयसीआय बँकेची कर्ज देणारी कंपनी व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजकडून चौकशी सुरू होती. यासंदर्भात ईडीचे अधिकारी दीपक कोचर यांची सातत्याने चौकशी करत होते त्यानंतर दीपक यांना ईडीने अटक केली. व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजला देण्यात आलेल्या कर्जाचा दुरुपयोग केल्याबद्दल ईडीने दीपक यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक यांच्याविरोधात ठाम पुरावे मिळाल्यानंतर चौकशी एजन्सीने त्यांना चौकशीसाठी बोलावले मात्र बर्‍याच व्यवहारांचे त्यांना योग्य स्पष्टीकरण देता आले नाही तेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांना अटक करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, २०१० मध्ये दीपक कोचर यांच्या फर्म न्यूपावर रिन्यूएबल्समध्ये व्हिडिओकॉन ग्रुपने ६४ कोटी आणि मॅटिक्स फर्टिलायझरकडून ३२५ कोटींची गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर लगेचच ही गुंतवणूक करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

असा विश्वास आहे की, व्हिडीओकॉन व मेटीक्स व्यतिरिक्त इतर कंपन्यांना कर्ज देण्याबाबत तपास यंत्रणाही तपास करत असल्याने चंदा कोचर यांनाही आगामी काळात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आयसीआयसीआय बँकेचे प्रमुख असताना चंदा यांनी कंपन्यांना दिलेली सर्व कर्जे चौकशी एजन्सीद्वारा तपासले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


संसदेतील १७ खासदारांना कोरोना; मिनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडेंचा समावेश