घरदेश-विदेशविमानातून मैला खाली टाकू नका, अन्यथा दंड भरा – DGCA

विमानातून मैला खाली टाकू नका, अन्यथा दंड भरा – DGCA

Subscribe

DGCA अर्थात नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने भारतात सेवा पुरवणाऱ्या सर्व विमान कंपन्यांना नोटीस बजावली आहे. टेकऑफ करताना किंवा लँडिंग करताना विमानाच्या टॉयलेटमधून मैला खाली टाकू नये, असे केल्यास ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल असं या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या अल्टिमेटमनंतर अखेर DGCA अर्थात नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने भारतात सेवा पुरवणाऱ्या सर्व विमान कंपन्यांना नोटीस बजावली आहे. टेकऑफ करताना किंवा लँडिंग करताना विमानाच्या टॉयलेटमधून मैला खाली टाकू नये, असे केल्यास ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल असं या नोटीसमध्ये नमूद करण्यात आल्याचं वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे. ३० ऑगस्ट रोजी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. ‘यासंदर्भात ३१ ऑगस्टपूर्वी नोटीस न पाठवल्यास आम्ही DGCAच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधी देणं बंद करू’ असा इशारा राष्ट्रीय हरीत लवादाने दिला होता. त्या पार्श्वभूमीवर डीजीसीएने ही नोटीस अखेर बजावली आहे.

माजी लष्करी अधिकाऱ्यानं केली होती तक्रार

ऑक्टोबर २०१६मध्ये दिल्ली एअरपोर्टजवळ राहणारे माजी लष्करी अधिकारी लेफ्टवनंट जनरल सतवंतसिंग दहिया यांनी राष्ट्रीय हरीच लवादाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. आपल्या घराच्या छतावर आणि आसपासच्या परिसरामध्ये दिल्ली विमानतळावरून टेकऑफ किंवा लँडिंग करणाऱ्या विमानांमधून टॉयलेटमधला मैला टाकला जात असल्याचा दावा त्यांनी तक्रारीमध्ये केला होता. यावर ५ डिसेंबर २०१६रोजी राष्ट्रीय हरीत लवादाने तपास करण्यासाठी ३ सदस्यीय समितीची नेमणूक केली.

- Advertisement -

विमानातून मैला टाकणं अशक्य, समितीचा दावा

या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार विमानातून अशा प्रकारे हवेत गेल्यानंतर टेक ऑफवेळी किंवा लँडिंगवेळी टॉयलेटमधून मैला टाकणं शक्य नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे. यासाठी समितीतील सदस्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या विमानांच्या ड्रेनेज सिस्टीमचं परीक्षण केल्याचं सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे या प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानांमधून टेकऑफ किंवा लँडिंग करताना हवेतच मैला टाकणं शक्य असल्याचा दावा विमान बनवणाऱ्या कंपन्यांकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, DGCA ने दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवर निर्णय होईपर्यंत आदेश पाळण्यासंदर्भातल्या सूचना विमान कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -