इंधन दर घटणार; भारत होणार तिसरी मोठी अर्थव्यवस्था

आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडला

New Delhi

आगामी काळात भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याचा अंदाज यंदाच्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. आज संसदेत हा आर्थिक सर्व्हे अहवाल मांडण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तो पटलावर ठेवला. उद्या मोदी २.० सरकारचे पहिले बजेट मांडले जाणार आहे.

या अहवालानुसार २०२० मध्ये भारताचा विकास दर ७ % राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाा आहे. तसेच २०२० मध्ये इंधनाचे दर कमी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. वित्तीय तूट ६.४ वरून ५.८ टक्क्यांवर येण्याची शक्यता आर्थिक पाहणी अहवालात नमूद केली आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षात गुंतवणूक आणि विक्रीमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने विकासदर वाढू शकतो असे ही या आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे. बांधकाम क्षेत्रात गती येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. देशात परकीय गंगाजळी मुबलक असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here