घरदेश-विदेशरॉबर्ट वढेरांच्या अटकेची शक्यता, ईडीने मांडली बाजू

रॉबर्ट वढेरांच्या अटकेची शक्यता, ईडीने मांडली बाजू

Subscribe

ईडीकडून नुकतीच वढेरा यांची आर्थिक घोटाळ्याप्रकरणी नुकतीच ७ तास कसून चौकशी केली होती.

काही दिवसांपूर्वीच ‘मी निर्दोष आहे हे सिद्ध होईल तेव्हाच मी राजकारणात प्रवेश करेन’, असं वक्तव्य करणाऱ्या रॉबर्ट वढेरा यांच्याविषयी एक नवी माहिती समोर आली आहे. ‘ईडी’ अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात रॉबर्ट वढेरा यांच्या अटपूर्व जामीन अर्जावर आपली बाजू मांडली आहे. ‘वढेरा चौकशीत सहकार्य करत नसल्यामुळे आर्थिक घोटाळाप्रकरणी त्यांना ताब्यात घेऊन चौकशीची परवानगी दिली जावी,’ असं ईडीने म्हटलं आहे. ईडीने कोर्टामध्ये म्हटले आहे की, ‘वढेरा यांच्याकडे अनेक मालमत्ता असून, त्या घोटाळ्याच्या माध्यमांतून खरेदी करण्यात आल्या आहेत. आरोपींनी कोणत्या प्रकारे या मालमत्ता गोळा केल्या याचा तपास लावणे गरजेचे आहे. या प्रकरणी चौकशी सुरु असून ती महत्वपूर्ण टप्प्यावर आहे. काळा पैसा शोधण्याच्या मोहिमेतला हा भाग आहे.’

याशिवाय रॉबर्ट वढेरा यांना या प्रकरणी तपासाला सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. तर, त्यांचा अंतरिम जामिनाचा कालावधी २५ मार्चपर्यंत वाढवण्यात आला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार त्यांनी वढेरांची दिवसभर चौकशी केली. ईडीकडून वढेरा यांची आर्थिक घोटाळ्याप्रकरणी नुकतीच ७ तास कसून चौकशी केली होती. ते मध्य दिल्लीच्या जामनगर हाऊस येथील ईडीच्या कार्यालयात चौकशी अधिकाऱ्यांसमोर हजर झाले होते. दरम्यान, हे प्रकरण परदेशात बेकायदा मालमत्ता खरेदीशी जोडलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -