घरदेश-विदेश५० हजार भारतीयांनी स्विकारले, अमेरिकेचे नागरिकत्व

५० हजार भारतीयांनी स्विकारले, अमेरिकेचे नागरिकत्व

Subscribe

अमेरिकेची सिटीझनशीप मिळवण्यामध्ये मेक्सिकोचे नागरिक पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यापाठोपाठ भारतीय दुसऱ्या तर चीनचे नागरिक तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने अमेरिकेत शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी येणाऱ्यांच्या ‘एच१-बी’ व्हिसाचे नियम अधिकच कडक केले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि नोकरदारांसाठी अमेरिकेतील शिक्षणाच्या तसंच नोकरीच्या संधी कमी झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या वर्षात साहाजिकच अन्य देशातून अमेरिकेमध्ये येणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही घटले आहे. मात्र, भारतीय नागरिक या गोष्टीला अपवाद आहेत. एका अहवालामध्ये मांडलेल्या आकडेवारीनुसार २०१७ मध्ये तब्बल ५० हजार भारतीयांना अमेरिकेचे नागरिकत्व प्राप्त झाले आहे. थोडक्यात नोकरी किंवा शिक्षणाच्या निमित्ताने अमेरिकेत गेलेल्या ५० हजार भारतीयांना गेल्या वर्षभरात तिथले नागरिकत्व मिळाले आहे. दरम्यान अमेरिकेची सिटीझनशीप मिळवण्यामध्ये मेक्सिकोचे नागरिक पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यापाठोपाठ भारतीय दुसऱ्या तर चीनचे नागरिक तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत अधिक वाढ?

अमेरिकेच्या DHS अर्थात ‘डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी’च्या प्रसिद्ध अहवालानुसार, २०१७ मध्ये भारतीयांना नागरिकत्व मिळण्याच्या संख्येत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१६ सालच्या तुलनेत २०१७ मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळालेल्या भारतीयांच्या आकडेवारीत ४ हजार ६१४ नागरिकांची वाढ झाली आहे. त्यामुळे ही संख्या ५० हजार ८०२ वर पोहचली आहे. अमेरिकेचे ‘ग्रीन कार्ड’ (नागरिकत्व) मिळणे ही खूप मोठी गोष्ट असते. अमेरिकेचे ग्रीन कार्ड मिळालेली व्यक्ती दीर्घकाळासाठी अमेरिकेत वास्तव्य करु शकते तसेच अमेरिकेत नोकरी देखील करु शकते.

वाचा : रामदेव बाबांची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी तुलना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -