घरदेश-विदेशगुजरातमध्ये महिलांनी केली सामूहिक आत्महत्या

गुजरातमध्ये महिलांनी केली सामूहिक आत्महत्या

Subscribe

त्रासाला कंटाळून गुजरातमध्ये चार महिलांनी सामूहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याघटनेत एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे.

आयुष्यातील मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून चार महिलांनी आत्महत्या केली आहे. या चौघींनी नर्मदा नदीत उडी मारून सामूहिक आत्महत्या केली आहे. पोलिसांनी यांचे मृतदेह हस्तगत केले आहे. यांच्या जवळ सापडलेल्या सुसाइड नोटवरून त्यांच्या आत्महत्याचे कारण समजले आहे या चौघांपैकी एक अल्पवयीन मुलगी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मीनाक्षी ठाकूर (२०), जमना ठाकूर (२०), शीला ठाकूर (१८) आणि हकी ठाकूर (१६) असे या महिलांचे नावे आहेत. या चौघी मागील अनेक वर्षांपासून मैत्रिणी असल्यामुळे त्यांनी एकत्रच आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. या घटनेची नोंद गुजरात पोलिसांनी केली आहे. दरम्यान या चौघांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून शवविच्छेदनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

का केली आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलींजवळ सुसाइड नोट मिळाली आहे. यामध्ये लिहिल्याप्रमाणे मीनाक्षीला हृदय विकाराचा त्रास होता, जमना ही विवाहित असून तिच्या सासरचे लोक तिचा छळ करत होती आणि इतर दोघींनी आपल्या मैत्रिणींशिवाय राहू शकत नसल्यामुळे ही आत्महत्या केली. आमच्या आत्महत्येबद्दल कोणालाही दोषी ठरवू नये या सुसाइड नोटमध्ये लिहिण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -