घरटेक-वेकफेकन्यूजवर आळा घालणार व्हॉट्सअॅपचे 'हे' नवे फीचर

फेकन्यूजवर आळा घालणार व्हॉट्सअॅपचे ‘हे’ नवे फीचर

Subscribe

फेसबुक आणि व्हॅट्सअॅपवर अलीकडे मेसेजेसचा पाऊस पडत असतो. नुसतेच शुभेच्छा देणारे मेसेज फॉर्वर्ड करणं अजिबात हानीकारक नसते. मात्र लोकांनी पाठवलेल्या खोट्या बातम्या किंवा अफवा पसरवून लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा मेसेजेसबद्दल व्हॉट्सअॅपने गंभीर दखल घेतली आहे. व्हॉट्सअॅपवर इतरांव्दारे फॉर्वर्ड करण्यात येणारे मेसेजेसवर ‘फॉर्वर्डेड’ असे लिहून येणार आहे. हा फिचर यु.एस. बरोबरच इतर देशांमधील व्हॉट्सअॅपवर सुरु करण्यात आला आहे. नवीन फिचर मिळवण्यासाठी युजर्सला त्यांचे व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागणार आहे. व्हॉट्सअॅपचे भारतात २३० दशलक्ष युजर्स आहेत. मेसेजवर फॉर्वर्डेडचा टॅग लागल्यामुळे युजर्सला मेसेज फॉर्वर्डेड असल्याचे समजणार आहे. यावरुन मेसेजवर विश्वास ठेवायचा की नाही हे युजर्सवर अवलंबून असेल.

फेकन्यूजवर आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपच्या जाहिराती
फेसबुकच्या मालकीचे व्हॉट्सअॅपव्दारे भारतामध्ये फेकन्यूज विरोधात नुकतीच जाहिरात केली होती. फेकन्यूजवर आळा घालण्याविषयी हिंदी आणि इंग्रजीबरोबरच स्थानिक भाषांमध्येही व्हॉट्सअॅपने जाहिरात केली होती. व्हॉट्सअॅपवर पसवल्या जाणाऱ्या फेकन्यूजचे परिणाम वाईट होतात यामुळे त्याला आळा घालणे आवश्यक आहे.

- Advertisement -

“फेकन्यूज आणि अफवांवर कशा प्रकारे आळा घालता येईल याबद्दल एक नवीन फिचर आज सकाळ पासून व्हॉट्सअॅपने सुरु केले आहे. इंग्रजी, हिंदी बरोबरच स्थानिक भाषांमधील वृत्तपत्रातून प्रसारित केलेल्या जाहिराती हा उपक्रमाचा पहिला टप्पा होता. येत्या काळात आम्ही यावर अधिक लक्ष ठेवणार आहोत. मेसेज फॉर्वर्ड करण्यापूर्वी आपण त्यातील सत्य जाणून घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला मेसेजवर काही संक्षय आला तर तुम्ही त्याला स्पॅम किंवा ब्लॉक करु शकता. लोकांना मिळालेले मेसेजेस हे फॉर्वर्डेड आहेत की नाही? याबद्दल युजर्सला माहिती मिळणे आवश्यक आहे. या माहितीमुळे लोकांना मेसेजवर विश्वास ठेवायचा की नाही याचा निर्णय घेण्यास मदत होणार आहे.”- व्हॉट्सअॅप प्रवक्ते

असे असेल नवे फिचर
१. मूलतः नवीन व्हॉट्सअॅप फिचर हे अफवा आणि फेकन्यूजवर आळा घालण्यासाठी बनवण्यात आले आहे.
२. यासाठी व्हॉट्सअॅप युजर्सला प्लेस्टोरमध्ये जाऊन आपले व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागणार आहे.
३. अनेक जणांना फॉर्वर्ड केलेला मेसेज तुम्हाला मिळाला असल्यास त्यावर फॉर्वर्डेड लिहून येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -