घरदेश-विदेश'Me To नव्हेच!' एम जे अकबर यांचं प्रत्युत्तर!

‘Me To नव्हेच!’ एम जे अकबर यांचं प्रत्युत्तर!

Subscribe

परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी आता त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाविरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. प्रिया रामानी यांच्याविरोधाच पतियाला उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात एका नावाजलेल्या पत्रकार संपादिकेने #MeToo चळवळीच्या अंतर्गत लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्यानंतर मोठी खळबळ माजली होती. आरोप झाल्यानंतर यासंदर्भात परराष्ट्र खाते किंवा केंद्र सरकारकडूनही कोणताही खुलासा करण्यात न आल्यामुळे अकबर यांच्याविरोधातील वातावरण अधिकच तापू लागले होते. त्यातच, स्वत: एम. जे. अकबर हेसुद्धा त्या काळात भारतात नसल्यामुळे संबंधित पत्रकाराच्या आरोपांना बळच मिळत होतं. मात्र, आता एम. जे. अकबर यांनी भारतात परतल्यानंतर त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळले तर आहेतच, मात्र त्यासोबतच संबंधित महिला पत्रकार-संपादिकेविरोधात मानहानीची याचिका देखील दाखल केली आहे. त्यामुळे आता अकबर यांनीच या महिलेविरोधात ‘Me To नव्हेच’ असाच काहीसा पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

काय आहे प्रकार?

‘मिंट’च्या माजी संपादिका प्रिया रामानी यांनी एम. जे. अकबर यांच्यावर काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. त्यावरून मोठं वादळ देखील उठलं होतं. विशेष म्हणजे प्रिया रामानी यांच्यासोबतच आणखीनही काही महिलांनी एम. जे. अकबर यांच्यावर तशाच प्रकारच्या लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्यामुळे हे प्रकरण वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले होते.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – #MeToo वादळ मोदी सरकारमधील मंत्र्याचा बळी घेणार?


पतियाला उच्च न्यायालयात याचिका

रामानी आणि इतर महिलांच्या आरोपांनंतर एम. जे. अकबर यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव येऊ लागला होता. मात्र, राजीनामा न देता अकबर यांनी आपली बाजू जोरकसपणे मांडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता त्यांनी रामानी यांच्याविरोधातच मानहानीचा दावा ठोकला आहे. भारतीय दंडसंहितेच्या कल ४९९ आणि ५०० अंतर्गत दिल्लीच्या पतियाला उच्च न्यायालयात अकबर यांनी मानहानीची याचिका दाखल केली आहे.

- Advertisement -

कधी सुरू झालं हे प्रकरण?

मागील वर्षी प्रिया रामानी यांनी एका लेखामध्ये त्यांच्यावरच्या लैंगिक शोषणाविषयी उल्लेख केला होता. मात्र, शोषण करणाऱ्याचं नाव मात्र त्यांनी तेव्हा घेतलं नव्हतं. ते नाव त्यांनी #MeToo चळवळ पुन्हा सुरू झाल्यानंतर आता घेतलं आहे. मात्र, ‘रामानी यांनी सदर लेख लिहिला, तेव्हा त्या माझी प्रतिमा मलीन करण्याची मोहीमच राबवत होत्या’, असा दावा आता अकबर यांनी केला आहे. ‘त्यांना हे माहीत होतं की त्यांच्या दाव्यामध्ये तथ्य नाही, म्हणून त्यांनी माझं नाव देखील घेतलेलं नाही’, असंही अकबर म्हणाले आहेत. हे सर्व बिनबुडाचे आरोप असल्याचा दावा अकबर यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -