घरदेश-विदेशमनोहर पर्रिकर उपचारासाठी पुन्हा अमेरिकेला जाणार

मनोहर पर्रिकर उपचारासाठी पुन्हा अमेरिकेला जाणार

Subscribe

अचानक अपचन आणि उलट्यांचा त्रास होऊ लागल्यामुळे पर्रिकरांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लिलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पर्रिकरांना पुन्हा अमेरिकेला उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मनोहर पर्रिकर उपचारासाठी पुन्हा अमेरिकेला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना अपचनाचा त्रास जास्त होऊ लागल्यामुळे लिलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांन पुन्हा उपचारासाठी अमेरिकेला जाण्यास सांगितले आहे. बुधवारी संध्याकाळी पर्रिकर अमेरिकेला रवाना होणार आहे.

पर्रिकर पुन्हा अमेरिकेला जाणार 

स्वादुपिंडाच्या कर्करोगावर गेल्या काही महिन्यांपासून मनोहर पर्रिकर यांच्यावर उपचार सुरु आहेत. अमेरिकेत तीन महिने उपचार करुन जूनमध्ये ते भारतात परतले होते. त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्यामुळे ते अमेरिकेला उपचारासाठी जाणार आहेत. पणजी येथील पंतजली स्टोअर्सचे उद्धाटन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना माजी आमदार आणि भाजपचे युवा नेते सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी ही माहिती दिली.

- Advertisement -

एक महिना अमेरिकेला घेणार उपचार

मनोहर पर्रिकर २२ ऑगस्ट रोजी अमेरिकेहून ११ दिवसांचे उपचार घेऊन गोव्यात परतले होते. मात्र तिथून आल्यानंतर त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईच्या लिलावती रुग्णालयता दाखल केले. लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करुन त्यांना पुन्हा उपचारासाठी अमेरिकेला जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ते बुधवारी रात्री अमेरिकेसाठी रवाना होणार आहे. मनोहर पर्रिकर एक महिन्यासाठी अमेरिकेला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -