घरदेश-विदेशराहुल गांधींच्या टीकेनंतर नरेंद्र मोदींचे ओबीसी कार्ड

राहुल गांधींच्या टीकेनंतर नरेंद्र मोदींचे ओबीसी कार्ड

Subscribe

संपूर्ण समाजाला काँग्रेस अध्यक्ष चोर म्हणू लागले

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नांदेडच्या सभेत, सर्व चोरांचे नाव मोदी कसे? असे वक्तव्य केले. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यालाच प्रचाराचा मुद्दा बनवला. अकलूजच्या सभेत मोदींनी मी मागास जातीचा असल्यामुळेच काँग्रेसचे नेते माझी लायकी काढण्याचा प्रयत्न करतात. संपूर्ण समाजाला ते चोर म्हणून लागले आहेत, असे सांगत मोदी यांनी ओबीसी कार्डचा प्रथमच वापर या लोकसभा निवडणुकीत केला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी नांदेड येथे सभा घेतली होती. त्या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली होती. भाषणाच्या ओघात राहुल गांधी यांनी ‘सर्व चोरांचे नाव मोदी कसे?’ असा सवाल उपस्थित केला होता. राहुल गांधी यांचे हे वक्तव्य चांगलेच गाजले. मात्र पंतप्रधान मोदी यांनी मोठ्या खुबीने राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा आधार घेत, लोकसभा निवडणुकीत प्रथमच ओबीसी कार्ड बाहेर काढले.

- Advertisement -

बुधवारी सकाळी अकलूज येथे झालेल्या सभेत पतप्रधान मोदींनी आपल्या जातीवरून राहुल गांधींना घेरले. मी मागास असल्याने अनेकदा काँग्रेसच्या नेत्यांनी माझी लायकी काढण्याचा प्रयत्न केला; तसेच मी खालच्या जातीचा असल्याचे दाखवून देत मला शिवीगाळ केली, असे मोदी म्हणाले.

मी मागास असल्याने अनेकदा काँग्रेसने माझ्यावर टीका केली. मी खालच्या जातीचा असल्याचे सांगून मला शिवीगाळ केली. पण यावेळी ते सर्व मागास समाजाला चोर बोलू लागले आहेत. मला शिवीगाळ करता-करता काँग्रेसचे नामदार आता सगळ्या समाजाला शिवीगाळ करताना दिसत आहेत. आधी त्यांनी चौकीदाराला शिवीगाळ केली, आता ज्यांचे आडनाव मोदी आहे, त्यांनाही ते चोर बोलू लागले आहेत, असे सांगत पंतप्रधानांनी राहुल गांधींवर तोफ डागली.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत पंतप्रधान मोदींनी ओबीसी कार्ड काढले नव्हते. मात्र राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे त्यांना आयती संधी मिळाली. ती मोदींनी अजिबात न दवडता, राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -